मधु-कैटभ राक्षस-वध कथा

भगवान विष्णु द्वारा मधु-कैटभ राक्षस-वध

मधु-कैटभ राक्षस-वध – आपण निरनिराळ्या मंदिरांतून देवदर्शनास जातो, त्या त्या देवतांचे कार्य-आदर्श, शौर्य, धैर्य, सात्विकता व सचोटी या गुणांची पूजा करीत करीत आपण त्यांना वंदन करतो.

Image Credit :- Maa Shakti

देवी ही अशीच शक्तिदेवता आहे. फार प्राचीन काळी देव-दानवांच्या युद्धात देवांचा मोठा पराभव झाला.

राक्षसांनी देवांना जिंकून प्रमुख देवांना बंदिशाळेत ठेवले देवांचा पराभव झाल्यानंतर देवांनी दुर्गादेवी ची मदत मागितली.

देवीचे व राक्षसांचे जे संग्राम झाले त्याचे वर्णन श्री मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराणात केलेले आहे. दुग सप्तशती हा ग्रंथही मार्कंडेय पुराणाचा एक भाग आहे.

मधु-कैटभ राक्षस-वध कथा

देवीच्या राक्षसांशी झालेल्या सात युद्धांची माहित कथारूपाने माहीत करून घेऊ.

फार प्राचीन काळी स्वारोचिष मन्वंतरातील दुसऱ्या मनूच्या काळी चैत्रवंशातील सूर्यपुत्र म्हणविणारा सुरथ  राजा राज्य करीत होता. आपल्या प्रजेला मुलालेकरांसारखे वागविणारा दयाळू राजा नीतिनिपुण, न्यायी, शूर आणि रणधुरंधर होता.

या सूर्यपुत्र सुरथ राजाचा त्याच्या शत्रून बेसावधपणे पराभव करून त्याला त्याच्या राज्यातून हाकलून दिले. मंत्रिगण-मुत्सद्दींनी त्याला कोणतीही मदत न करता, ते शत्रूला फितूर झाले.राजधानीतून अपमानीत होऊन परागंदा झालेला सुरथ राजा सुमेधा ऋषींच्य आश्रमात आश्रयासाठी आला.आश्रमात हिंस्र पशू, वाघ-सिंह, हरिण, ससे आपल्या मूळ वृत्ती टाकून एकत्र शांतपणे रहात.

तेथे राजाला आपले राज्य, प्रजा आणि राणी,यांची आठवण होई.एके दिवशी राजाला आश्रमाजवळ अरण्यात एक भुकेलेला माणूस दिसला. राजाने त्याची विचारपूस करता तो एक भुकेलेला व्यापारी आहे असे समजले.

कोण, कुठून आलास? या राजाच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिले.”महाराज, मी समाधी वाणी व्यापार करून पत्नी व मुलाबाळांचे मी पोषण केले, पण पत्नी व मुलांनी धन-दौलतीच्या लोभाने मला घराबाहेर हाकलून दिले, निरा-धार केले. तरीसुद्धा पत्नी सुखी असेल ना? मुले सुरक्षित  , असतील ना? माझ्या विरहाने त्यांना दुःख होत असेल काय?या विचारांनी मला सतत घेरले आहे.

मनाला स्वस्थता नाही. चिंतेने झोप येत नाही.” राजा म्हणाला,“वाणीबुवा! तुमच्या मुलांनी, पत्नीने संपत्तीच्या लोभाने तुम्हाला घराबाहेर हाकलून दिले, तरी तुम्ही त्यांचीच, त्यांच्या सुखदुःखाची काळजी करावी, या तुमच्या वागण्यात तुमचे त्यांच्याबद्दल असणारे प्रेम आहे, की हा

तुमचा वेडेपणा आहे हे मला समजत नाही.”महाराज, माझे माझ्या पत्नीवर व मुलांवर निरंतर प्रेम असल्याने त्यांनी माझे अनेक अपराध

केलेले असूनही मनाच्या दुबळेपणामुळे निष्ठुर होऊन मी त्यांना विसरू शकत नाही, हे खरे आहे. माझी मनःस्थिती द्विधा झाली आहे.

अशी मनाची द्विधा अवस्था झाल्याने राजा सुरथ आणि समाधी वाणी सुमेधा ऋषींकडे गेले व त्यांना वंदन करून म्हणाले, “महाराज, आम्ही दोघेही आपणाकडे आश्रयाला आलो आहोत. मग त्यांनी आपापली हकीगत सविस्तरपणे त्यांना सांगितली .

त्यांची हकीगत ऐकून सुमेधा ऋषी म्हणाले,”बाबांनो, तुमच्या मनाच्या या अवस्था अविवेकी,आंधळ्या किंवा मूर्खपणाच्या नसून या प्राणिमात्रांच्या सहजप्रवृत्ती आहेत. माणसाला काही शारीरिक विकृती, व्यंग किंवा दृष्टिदोषही असतात. कोणी रातांधळा असतो, तर कुणाला दिवस, रात्र अंधाराशिवाय काहीच दिसत नाही.

काही जणांच्या नजरेत दोष नसूनही त्यांचे मन शांत नसते.हे सर्व मानवाला देवाने दान केलेल्या मन आणि बुद्धीमुळे घडते.माणसाच्या तुलनेने पशुपक्ष्यांना किती बुद्धी असते?

“पशुपक्ष्यांचे अपत्यप्रेम मानवाच्या अपत्य प्रेमापेक्षा खचितच श्रेष्ठ असते , मनुष्यप्राणी म्हातारपणाची काठी किंवा आधार या भावनेने आपल्या मुलांचे संगोपन करतो,तसे पशुपक्षी करीत नाहीत.

पिलांच्या पंखांत जोर येऊन ती उडू लागेपर्यंतच पक्षिणी आपली स्वतःची तहान-भूक विसरून त्यांचे संगोपन करते. पाऊस-वारा-ऊन यांची पर्वा न करता पिलांसाठी अन्न शोधून आणून ती त्यांना भरविते. प्राणीही आपलं बछडं स्वतः अन्न मिळवू लागेपर्यंतच त्यांचा सांभाळ करतात. ही निसर्गाने दिलेली सहज भावना आहे यात आश्चर्यकारक काही नाही.

हा मायेचा प्रभाव असून,माया ही देवाची दूती किंवा प्रेरिका आहे! मायाप्रभावाने पतंग ज्योतीवर झडप घालून स्वतःला जाळून घेतोच ना ?

ही माया चराचरांना काम करण्याची बुद्धी देते, त्यासाठी ती प्रथम मोहात पाडते. त्यामुळे तहान-भुकेची जाणीव होऊन अन्न मिळविण्यासाठी त्या त्या पदार्थांबद्दल प्राणिमात्रात आसक्ती उत्पन्न होऊन तो ते मिळविण्यासाठी परिश्रम करतो, झगडू लागतो.

माणसाचंही मन त्याच प्रकारचं आहे. देवाने मानवाला पशुपक्ष्यांपेक्षा जास्त देणगी या बुद्धीच्या व विचारांच्या शक्तीने माणूस हवी असलेली वस्तू मिळविण्यासाठी धडपडतो, हीच त्याची कर्मप्रवृत्ती. माणूस विचारी असल्याने शेवटी त्याला मोक्ष मिळविण्याची इच्छा उत्पन्न होते व त्यांपैकी काही

भाग्यवान मोक्षसिद्धी मिळवितात. ही माया तिन्ही लोकांची माता आहे. आणि माता असल्याने ती आपल्या लेकरांचे कल्याण करते.

आपल्या सामर्थ्याने अपत्यांचे संकट निवारण करते. या योगमायेने देवांच्याही शत्रूशी युद्ध करून देवांना संकटमुक्त केले आहे.देव अमर आहेत हे खरे, पण त्यांनाही सत्य, न्याय आणि प्रतिष्ठा यासाठी झुंज द्यावी लागतेच. स्वर्गाचे राज्य व इंद्राचे अधिकार जिंकण्यासाठी राक्षसांनी इंद्रादि देवांशी युद्ध केले व देवांचा पराभव करून त्यांना बंदिवासात टाकले.

विष्णु द्वारा मधु-कैटभ राक्षस-वध

विष्णूच्या कानातील मळापासून मधू आणि कैटभ हे दोन असूर जन्मले. ब्रह्मा हा भगवान विष्णूंचा पुत्र  ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या बेंबीमधून झाली.

शेषशायी भगवान ज्यावेळी योगनिद्रेत होते ज्यावेळी मधू आणि कैटभ ब्रह्मदेवाला खूप त्रास देऊ लागले,ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे रक्षणासाठी आले.

त्यावेळी भगवान झोपलेले होते व माता लक्ष्मी त्यांचे पाय चुरीत होती. ब्रह्मदेवाने मातेची स्तुती केली व मधू आणि कैटभ यांच्यापासून रक्षण करण्यासाठी भगवानांना मोहमायेतून (निद्रेतून) उठवा असे विनविले.

मातेने भगवती योगमायेला भगवान् विष्णूंवरील निद्रापटल काढून घेण्याची विनंती केली.भगवान जागे झालेले पाहताच मधू आणि कैटभ उन्मत्तपणे ब्रह्मदेवाला सोडून भगवंतांच्या पाठीस लागले, म्हणजे ते जन्मदात्याशीच लढू लागले.

पाच हजार वर्षे हा समर प्रसंग चालू होता. शेवटी जयपराजय न ठरल्याने मधू आणि कैटभ भगवंतांच्या शौर्यावर खूष झाले व त्यांनी भगवान विष्णूंना वर मागण्यास सांगितले. मायेच्याआवरणाखाली असलेले राक्षस अहंकार व गर्वाने इतके उन्मत्त झाले की, प्रत्यक्ष पित्याला वर देण्याइतकी त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली.

भगवान म्हणाले, “ बाळांनो, तुम्ही असा वर द्या, की तुम्हा दोघांचेही मरण माझ्या हातून व्हावे.अविवेकीपणाने दिलेला वर याप्रमाणे उलटला. राक्षस म्हणाले, “आमचे मरण जमिनीवर किंवा पाण्यावर होऊ नये!” भगवंतांनी ‘तथास्तु!’ म्हणतच त्या दोन्ही राक्षसांना मांडीवर घेतले आणि हातातील चक्राने त्यांची भगवंतांना डोकी उडवली व ब्रह्मदेवांचे रक्षण केले.

योगमायेने केल्याने ब्रह्मदेवांवरील संकट टळले.त्यांनी भगवती योगमायेची कृतज्ञतापूर्वक स्तुती केली. यास्तुतीमुळे योगमाता या त्रिलोकात अवतरली. तिने वेळोवेळी दैत्यांशी युद्ध करून देवगण व भक्तांची संकटे निवारण केली,या सर्व कथा आपण पुढे पाहू!”

हेही वाचा

श्री मयुरेश्वर मोरगांव Shri Mayureshwar Ganpati Mandir Morgaon

error: Content is protected !!