Best Marathi ukhane for bride”मराठी उखाणे नवरदेव व नवरी साठी “

0

” मराठी उखाणे नवरा मुलगा व नवरी मुलीसाठी ” 

Marathi Ukhane – मित्रानो आजच्या ह्या जगात आपण सर्व काही करू शकतो मात्र काही गोष्टी अश्या आहेत ज्या काळाप्रमाणे मागे राहिल्या मात्र आज हि काही प्रसंगी त्या गोष्टी गरजेच्या असतात .
त्यातीलच एक गोष्ट म्हणजे उखाणे घेणे ,उखाणे हे सर्वात महत्वाचे असतात जे तुम्हाला लग्नाच्यावेळी घ्यावे लागतात मात्र आजच्या काळात ते कोणालाही माहित नाहीत .मग वेळप्रसंगी आपल्याला ते कोणी वडीलधाऱ्या अथवा मित्रांना विचारावे लागतात तेही त्यांचे रटलेले उखाणे तुम्हाला सांगतात ज्यात काहीही नवीन नसते .

Ukhane For Male
                                                   Ukhane For Male

उखाणे म्हणजे काय? (About Marathi Ukhane)

मित्रानो पूर्वीच्या काळी बायांना आपल्या नवऱ्यास नावाने हाक मारण्याची परवाणगी नसायची आता जरी बायका आपल्या नवऱ्याला सर्रास त्याच्या नावाने हाक मारत असल्या तरी पूर्वीच्या काळी मात्र अशी पद्धत नव्हती. मग नवऱ्याचं नाव कसं घ्यायचंह्या प्रश्नावर तोडगा म्हणूनच उखाण्यातून नाव घेण्याची सुरूवात झाली असावी.

उखाणे म्हणजे लहान लहान आणि यमक जुळवून केलेल्या वाक्यरचनेतून आपल्या पतीचे नाव घेणे. खासकरून महाराष्ट्रीयन लग्नात नवरा आणि नववधूंना उखाण्याचा आग्रह केला जातो. आजकाल उखाण्यात बरीच विविधता दिसून येते. टिपीकल उखाण्यासोबतच विनोदी उखाणेही खूपच लोकप्रिय आहेत. पाहूया उखाणे आणि त्यातील विविध प्रकार.लग्नविधीसाठी घेतले जाणारे मराठी उखाणे (Marathi Ukhane for Marriage)

Marathi Ukhane For Female & Male

Ukhane In Marthi – परंतु मित्रानो आता काळ बदलला आहे त्यामुळे तुमचे उखाणे हि बदलायला हवे ज्यात थोडी संस्कृती व थोडे नवीन पिढीचे changes दिसेल ज्याने कोणालाही ते ऐकल्यावर छान असे वाटेल .

Marathi ukhane list- येथे तुम्हाला सर्व प्रकारचे छान व नवीन उखाणा मिळतील ज्यात नवऱ्या मुलासाठी व नवरी मुलींसाठी असंख्य उखाणे मिळतील

हे देखील बघा

Marathi Status For WhatsApp-व्हाट्सअप मराठी स्टेटस

200+ Attitude Status In Marathi मराठी एटीट्यूड स्टेटस

The A – Z Of Marathi Status- मराठी स्टेटस

नवरदेवाची लग्नाचे मराठी उखाणे-Marathi Ukhane For Male

 

लग्नविधीसाठी घेतले जाणारे मराठी उखाणे (Marathi Ukhane for Marriage)

 • ” कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो ऋतुजाला ला जलेबी चा घास”

Marathi Ukhane For Bride

 • ” पुरणपोळीत तुप असावे साजुक,मालिनी बाई आहेत आमच्या फार नाजुक”Marathi Ukhane For Bride

 • ” ब्रम्हदेवाच्या पुत्राचे नाव आहे कली सायली माझी देवसेना आणि मी तिचा बाहुबली

Marathi Ukhane For Bride

 • सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,सारिका मला मिळाली आहे अनुरूप.

नवरदेवासाठी उखाणे / Marathi Ukhane For Groom

 • लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.नवरदेवासाठी उखाणे / Marathi Ukhane For Groom

Marathi ukhane for male romantic

 

Navrdevasathi Marathi ukhane

 

 • ” संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,राणी चे नाव घेतो सर्वजण ऐका”
 • ” नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,मोहिनी झाली आज माझी गृहमंत्री “
 • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,नेहा च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
 • ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, स्नेहा चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. • ” एक होती चिऊ, एक होता काऊ, मोहिनी चे नाव घेतो डोक नका खाऊ”
 • ” सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल,संसार करु सुखाचा मोहिनी तु, मी आणि एक मुल”
 • ” हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,माझी काजल नाजुक जसे गुलाबाचे फुल “
 • “दारी होते कोनाडे त्यात होती पळी,माझी राणी पैश्याच्या व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी”
 • ” आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, कविता चे नाव आहे अमृतापेक्षा ही गोड”
 • ” श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, रोहिणी गेली माहेरी की होतात माझे हाल “
 • ” माझे पिता … माझी माता,शुभमुहूर्तावर घरी आणली खुशाली ही कान्ता “
 • ” जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध,कविता च्या सहवासात झालो मी धुंद “
 • ” खेळत होतो क्रिकेट प्रियाला पहिले आणि पडली माझी व्हीकेट”
 • ” आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा साक्षीचे नाव घ्यायला उखाणा कश्याला हवा “
 • ” मोह नाही माया नाही नाही मस्तर हेवा अंकिताचे नाव घेतो नीट लक्ष ठेवा “
 • ” जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,राणी च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने “
 • ” पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे,सुरज रावांचे नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे “
 • ” आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, राधिकाच्या आगमनाने पडली त्या सुखात भर “ • ” हत्तीच्या अंबारीला मखमली झुल ,माझी कविता नाजूक जसे गुलाबाचे फुल “
 • ” चांदीच्या ताटात बटाट्याची भाजी , तुझी बहीण माझी आणि मी तुझा दाजी “
 • ” पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय,सविता ला आवडते नेहमी दुधावरची साय “
 • ” नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,मोनाली च आहे माझ्या जीवनात सर्वस्व “

 

नवरीची लग्नाचे मराठी उखाणे- Marathi ukhane for female

 

Marathi Ukhane

 • ” Marathi Ukhaneसाडी घालते फॅशनची पदर लावते साधा राहुल राव माझे कृष्ण मी त्यांची राधा”
 • “ओल्या ओल्या केसाला टॉवेल द्या पुसायला  निलेश रावांचे नाव घेते शालू द्या नेसायला”
 • ” गुलाबाचे फुल दिसायला ताजे , मेघराज रावांचे नाव घेते सौभाग्य माझे “
 • ” गुलाबाची काली आणि मोगऱ्याचा गजरा, माझ्या येड्याच्या मागे साऱ्या साटव्यांच्या नजरा “
 • ” पप्पी नाही दिली होती म्हणून बसले होते रुसून निखल्याचे नाव घेते शेंबूड पुसून “

नवं नवीन माहिती साठी आमच्या facebook page Marathi Status ला नक्की भेट द्या .

Marathi ukhane for sankranthi
 • ” नाव नाव घे हट्ट हा कसला कळात नाही , अभिषेख चे नाव असते नेहमीच ओठांवर उखाणा मात्र सुचत नाही “
 • ” गुलाबाच्या झाडाला फुले येती डाट राकेश रावांचे नाव घेते सोडा माझी वाट “ • ” सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात निलेश रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट “
 • ” सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी मोहित रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी “
 • ” नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे कुणाल रावांसारखे पती जन्मो जन्मी मिळावे “
 • ” मोह नसावा पैश्याचा गर्व नसावा रूपाचा ,कुणाल बरोबर संसार करील सुखाचा “
 • ” मंगळसुत्रच्या दोन वाट्या असतात सासर माहेरची खून ,राहुल रावांचे नाव घेते मी त्यांच्या आईची होणारी सून “
 • ” सासू सासरे आहे माझे प्रेमळ नणंद माझी हौशी ,कुणाल रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी “
 • ” उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टाकते केळीला सुमित रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या वेळेला “
 • “ज्यांना आवडतो पिझ्झा आणि बर्गर त्यांना काय माहित काय मजा असते IN चटणी and भाकर “
 • ” चांदीच्या ताटात गाजराचा हलवा ,निलेश रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा “
 • ” छत्रपती शिवाजी राजांनी किल्ला जिंकला ,शक्ती पेक्षा युक्ती ने निलेश रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ती ने “
 • ” अभिमान नाही संपत्त्तीचा , गर्व नाही रूपाचा ,महेश रावांना घास भरविते वरन भात तुपाचा “
 • ” रुपेरी सागरावर चंदेरी लाट , मुकेश रावांचे नाव घेते सोडा माझी वाट “
 • ” वड्यात वडा बटाटा वडा ,लोकेश ने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा “
 • ” चांदीच्या निरांजनात लावली फुलवात किशोर रावांचे नाव घ्यायला आजपासून सुरुवात “
 • ” गळ्यात मंगळसूत्राची वाटी सौभाग्याची खून सुशांत रावांचे नाव घेते पाटलांची सून “
Marathi funny ukhane For  Female

 

 • ” गोव्यावरून आणले काजू ,राहुल रावांच्या थोबाडीत मारायला मी कश्याला लाजू “
 • ” साडीत साडी नववारी ,मोहित रावांच्या भारीच आहे आवडी निवडी “
 • ” चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा ,मी लग्नचं करत नाही बोंबलत बसा “
 • ” फेसबुक वर ओळख झाली व्हाट्सअप वर प्रेम जुळले ,महेश राव आहे खरंच बिनकामी हे लग्न झाल्यनंगतरच कळले “
 • ” मुळा मुठा नदीकिनारी वसले सुंदर पुणे ,रमेश रावांचे नाव घेते माझ्या संसारात नसेल कसले उणे”
 • ” लग्न म्हणजे आहे जीवनात सुखाची चाहूल ,मोहित रावांच्या सोबत ठेवते संसारात पहिले पाऊल “ • ” सागरामध्ये तरंगत होती नौका सुनील रावांचे नाव सांगते सर्वजण ऐका “
 • ” नदीच्या काठावर कृष्णा वाजवितो बासरी ,बस झालं आता माहेर चाल आता सासरी “
 • ” साखरीच पोत सुईने उसवल ,रोहित रावांना मी पावडर लावून फसवलं “
 • ” चंदनाच्या ताटाला सोन्याचा वेढा ,मी त्याची बबडी आणि तो माझा बबड्या “
 • ” आकाश्यात तारे अनेक चन्द्र मात्र एक प्रज्ञेश चे नाव घेते पाटलाची लेक
  सहज गेले अंगणात नजर गेली आकाशात धनंजय चा फोटो भारताच्या नकाश्यात “
 • ” हिरे में हिरा हो तो उसे केहेते हे कोहिनुर राव का नाम लेते हि काशी के चेहेरे पर आता है नूर “
 • ” जन्म दिला आईने पालन केले पित्याने अशोक रावांचे नाव घेते पत्नी ह्या नात्याने “
 • ” आई आहे प्रेमळ सासू आहे हौशी दर्शन यांचे नाव घेते गृह्प्रवेश्याच्या दिवशी “
 • ” निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी,मोहित रावांचे नाव घेते पाटलांच्या च्या घरी “
 • सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात,सुनील रावांचे नाव घेते मोहित्यांच्या घरात” • ” लाल मणी तोडले काळे मणी जोडले मुकेश रावांसाठी आईवडील सोडले “
मंगळागौरीसाठी खास उखाणे Marathi Ukhane for Manglagaur
 • सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे, ….. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.
 • सासर आहे छान, सासू आहे होशी, …. चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
 • निलवर्ण आकाशात  चमकतो शशी ….नाव घेते  मंगळागौरी पूजनाच्या दिवशी.
 • मेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते, ….. नावाने मंगळागौर सजवते.
 • मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती, ….च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..!

Marathi ukhane -लग्न हा प्रसंग प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वपूर्ण प्रसंग असतो ज्यात खूप मजा मस्ती असते त्यासाठी आम्ही थोडे funny मराठी उखाणे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे .

परंतु उखाणे हे फक्त लग्नाच्या प्रसंगासाठी असतात आपल्या जोडीदारास चिडवण्यासाठी नाही याकडे लक्ष देऊनच आपल्याला आवडलेले उखाणे वापरावे हि नम्र विनंती .

आम्ही आशा करतो कि हे सारे उखाणे तुम्हाला आवडले असतील . कृपया तुमच्या जवळ हि काही उखाणे असतील तर आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा आम्ही नक्की त्या उखाण्यास ह्या लेखात समाविष्ठ करून घेऊ ,आणि उखाणे आवडलेच असतील तर फेसबुक व व्हाट्सअप वर नक्की शेयर करा . ज्यामुळे अनेकांना याचा फायदा मिळेल .

#ukhaneinmarathi #ukhanemarathi #marathibride #ukhane #marathiukhaneforfemale #marathiukhane #marathi ukhane #marathiukhane2021 #ukhane