Sensex vs Nifty in Marathi | सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय ?

Sensex, BSE, NSE, AND NIFTY म्हणजे काय ?

Sensex and Nifty in Marathi | सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय ?- सर्वसाधारणत: पेशंटला बरे वाटते आहे की त्याची तब्येत अधिक बिघडली आहे, हे पाहण्यासाठी थर्मामीटरने त्याचा ताप पाहिला जातो, तसाच देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे की नाही हे पाहण्यासाठीही एक थर्मामीटर वापरला जातो, त्याला म्हणतात शेअर-बाजाराचा निर्देशांक Stock-market index.



आपल्या देशातील NSEआणि BSEही दोन प्रमुख स्टॉक-एक्स्चेंजेस मुंबईतच आहेत. पैकी बॉम्बे स्टॉक-एक्स्चेंज (BSE) हे देशातील सर्वांत जुने स्टॉक-एक्स्चेंज आहे.
बॉम्बे स्टॉक-एक्स्चेंजच्या निर्देशांकाला सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक-एक्स्चेंजच्या (NSE) निर्देशांकाला निफ्टी म्हणून ओळखले जाते.
Sensex vs Nifty in Marathi | सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय ?
शेअर-बाजार म्हटले की, शेअर्समध्ये एक रुपयाचीसुद्धा गुंतवणूक न केलेल्या माणसाला देखील सेन्सेक्स (Sensex ) हाच शब्द सर्वप्रथम आठवतो. याचे कारण, या निर्देशांकात मोठ्या प्रमाणात होणारा चढ-उतार हा वर्तमानपत्राच्या हेड-लाईनचा हमखास विषय होऊ शकतो आणि गेल्या वर्षात तर अशी वेळ किमान चार-पाच वेळा तरी आली असल्याने सेन्सेक्स’ आणि निफ्टी हे शब्द आता आपोआपच सर्वांना ठाऊक आहेत.



पण निफ्टीपेक्षा लोकांच्या तोंडी सेन्सेक्स जास्त रुळला आहे; याचे कारण तो शब्द ते आधीपासून ऐकत आले आहेत, हे एक; आणि सेन्सेक्समधील चढ-उताराचे आकडे निफ्टीच्या आकड्यांपेक्षा तिप्पट मोठे असल्यामुळेही ते लगेचच नजरेत

भरतात, हे दुसरे!असो.
शेअर निर्देशांक आणि थर्मामीटर यांत फरक एवढाच आहे की, आजारी माणसाच्या बाबतीत थर्मामीटरचा पारा चढत जाणे हे तब्येत बिघडल्याचे लक्षण असते, तर शेअर-बाजाराचा निर्देशांक चढत जाणे हे अर्थव्यवस्था सुदृढ असल्याचे व भांडवल बाजारातील तेजीचे लक्षण मानले जाते.

तुलना केल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही

सोन्याचा दर दहा ग्रॅमला १२,००० रुपये झाला आहे असे नुसतेच जरी कोणी म्हणाले तरी आपल्याला ते महाग झाल्याचे जाणवते; कारण आपल्या मनात मागच्या वर्षी याच महिन्यात ते १०,००० रुपयांनी मिळत होते, याची आठवण ताजी असते.



कोणत्याही वस्तूचा दर आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा आपण मनातल्या मनात कळत-नकळत त्या दराची दुसऱ्या कोणत्या तरी दराशी तुलना करत असतो. मग ती तुलना त्याच वस्तूच्या पूर्वी कधीतरीच्या किमतीशी असो किंवा दुसऱ्याच कोणत्या तरी वस्तूच्या किमतीशी असो. पण अशी तुलना केल्याशिवाय आपल्याला त्या आकड्यातून नेमका अर्थबोध होत नाही. सेन्सेक्स (Sensex ) बाबतही असेच असते.
आज सेन्सेक्स १७,८५० आहे असे नुसतेच कोणी सांगितले, तर आपल्याला त्यातून काहीच बोध होणार नाही, पण काल सेन्सेक्स १७,५०० होता आणि तो आज १७,८५० आहे असे म्हटले की आपल्याला लगेच उमगते, “Yes, कालच्या पेक्षा आज बाजारात तेजी आहे.” सेन्सेक्समुळे सर्वसाधारण गुंतवणूकदाराला अशा रितीने बाजाराच्या रागरंगाचा अंदाज लगेच
बांधता येतो.

Sensex, BSE, NSE, AND NIFTY (सेन्सेक्स) म्हणजे काय हे नीट लक्षात घेऊ

सेन्सेक्स हा शब्द Sensitive Index या दोन शब्दांचे एकत्रीकरण आहे. सेन्सेक्स काढण्याची पद्धत तसे पाहता अत्यंत शास्त्रशुद्ध आहे, पण तशीच ती थोडीफार किचकटही आहे. शिवाय ती पद्धत काटेकोरपणे समजून घेतली, तरी आपल्याला त्या गोष्टीचा प्रत्यक्षात काहीच उपयोग नाही.
कारण त्यातली कोणतीही आकडेमोड करायची आपल्यावर वेळही येत नाही किंवा ती आकडेमोड करायचे आपल्याला कधी कारणही पडत नाही. असे असले तरीही मी आवर्जून अगदी थोडक्यात का होईना पण सेन्सेक्स काढायची पद्धत सांगणार आहे, याचे कारण सेन्सेक्सची संकल्पना मुळातच नीट माहीत नसल्यामुळे सेन्सेक्समध्ये थोडी जरी घसरण झाली तरी अनेकजण अक्षरश: आकाश कोसळल्यासारखे गडबडून जातात आणि तशा गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या हातातले चांगले चांगले शेअर्ससुद्धा घाबरून विकून टाकतात.
या उलट सेन्सेक्समध्ये किंचितशी जरी वाढ झाली तरी आता प्रत्येक कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ यापुढे जणू दररोजच होणार आहे आणि आपले हात उद्यापासून जणू आभाळालाच टेकणार आहेत अशा भ्रमात, कचऱ्याच्या पेटीत टाकायच्या लायकीचे शेअर्सही डोळे झाकून विकत घेतात. थोडक्यात म्हणजे, छाप पडो वा काटा, सेन्सेक्स विषयक अज्ञानामुळे तोटा होण्याचीच शक्यता अधिक असते. निदान आपली तरी अवस्था तशी होऊ नये, यासाठी आपण प्रथम सेन्सेक्स म्हणजे काय हे नीट लक्षात घेऊ.

RELATED

Sensex, BSE, NSE, AND NIFTY सेन्सेक्स/निफ्टी म्हणजे काय आणि तो का, कसा काढतात?

NOTE:-कालच्यापेक्षा आज सेन्सेक्सचा आकडा वाढलेला असला की सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज वाढ झाली आहे, किंवा कालच्यापेक्षा आज सेन्सेक्सचा आकडा उतरलेला असला की सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. प्रथम तो गैरसमज मनातून हद्दपार करा.
एकाच वेळी सर्वच शेअर्सचे भाव पडतात वा चढतात, असे नाही.
मुंबई स्टॉक-एक्स्चेंजवर सुमारे ८,००० छोट्या-मोठ्या लिमिटेड कंपन्या नोंदवलेल्या आहेत. त्यातल्या सुमारे २,५००-३,००० कंपन्यांच्या शेअर्सची शेअर बाजारात रोजच्या रोज खरेदी-विक्री होते. शेअर-मार्केटमध्ये या सर्वच कंपन्यांच्या शेअर्सचे भाव एकाच वेळी उतरतात किंवा चढतात असे मुळीच नाही.


शेअर-मार्केटमध्ये आज कदाचित औषध कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढलेले असतील, तर कदाचित इंजिनिअरिंग उद्योगातील कंपन्यांचे भाव उतरलेले असतील, उद्या कदाचित इंजिनिअरिंग उद्योगातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढलेले असतील,तर खताचा वा सिमेंटच्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्सचे दर कदाचित उतरलेले असतील. दुसरे म्हणजे, एकाच प्रकारच्या उद्योगातील सर्वच कंपन्यांच्या शेअर्सचे भाव एकाच वेळी उतरतात वा चढतात असेही नाही.
इंजिनिअरिंग क्षेत्रातील ‘अ’ आणि ‘ब’ कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढलेला असेल, तर त्याच वेळी इंजिनिअरिंग क्षेत्रातीलच ‘क’, ‘ख’, आणि ‘ या कंपनीच्या शेअर्सचे भाव कदाचित उतरलेलेही असतील. सर्वच शेअर्सच्या भावातील वाढ वा घट समप्रमाणात नसते शिवाय एकाच प्रकारच्या उद्योगातील ज्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव चढतात अथवा उतरतात तेही सारख्याच प्रमाणात चढतात अथवा उतरतात असेही नाही.
इंजिनिअरिंग क्षेत्रातील ‘अ’च्या शेअर्सच्या दरात केवळ अर्धा टक्के वाढ झालेली असेल, तर ‘ब’च्या शेअर्सच्या दरात पाच-सात टक्केसुद्धा वाढ झालेली असेल. या उलट ‘क’च्या शेअर्सच्या दरात नुसतीच अर्धा टक्के घट झालेली असेल, तर ‘ख’च्या शेअर्सच्या दरात तीन टक्के आणि ‘ग’ कंपनीच्या बाबत तर ही घट दहा टक्केसुद्धा झालेली असू शकेल. त्यामुळे, कोणत्या तरी एकाच कंपनीच्या शेअर्सच्या दरातील चढ-उतारावरून साऱ्या बाजाराबाबत अंदाज बांधणेही बरोबर ठरणार नाही.

Share Market मधील सर्वच कंपन्या सारख्या आकाराच्या नसतात

बरे, देशातील सर्वच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समधील प्रत्येक क्षणाचा चढ-उतार एकत्रितपणे लक्षात घेऊन अर्थव्यवस्थेबाबत निष्कर्ष काढायचा म्हटले, तर कंपन्यांची संख्या इतकी मोठी आहे की ते व्यवहार्यही होणार नाही. शिवाय अशी सरासरी काढण्यातली आणखी एक अडचण म्हणजे सर्वच कंपन्या सारख्या आकाराच्या नाहीत. काही कंपन्यांच्या शेअर्सची संख्या कित्येक लाखांमध्ये आहे आणि त्यांची दररोजची उलाढालही कोट्यवधींची आहे, तर काही कंपन्यांचा जीव अगदीच छोटा आहे.
काहींच्या एकेका शेअरची किंमत पाच-दहा हजार रुपये आहे, तर काहींचे शेअर्स जेमतेम दहा-वीस रुपयांचे आहेत. त्यामुळे सर्वच कंपन्या सारख्या मानून त्यांची सरासरी काढणे व त्यावरून साऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत निष्कर्ष काढ़ने  हेही योग्य ठरणार नाही.

शितावरून भाताची परीक्षा

असे असले, तरी एका दृष्टिक्षेपात भांडवली बाजाराचा आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेचा कल तेजीकडे आहे की मंदीकडे हे कळण्यासाठी काही तरी निर्देशक तर हवाच! या हेतूनेच मग कही प्रातिनिधिक कंपन्यांचीच निवड करून त्यांच्या शेअर्सच्या दरातील चढ-उतारानुसार निर्देशां काढणे, एवढाच व्यावहारिक पर्याय उरतो. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या बाबत नेमका हाच उपाय अमलात आणला आहे.
सेन्सेक्स (Sensex) निर्देशांकासाठी ३० तर निफ्टी निर्देशांकासाठी ५० प्रातिनिधिक कंपन्या निवडलेल्या आहेत. प्रातिनिधिक कंपन्या निवडताना त्यांच्या शेअर्सची स्टॉक-एक्स्चेंजवर मोठ्या प्रमाणात उलाढाल होते आणि त्या कंपन्या बँका, सिमेंट निर्मिती, रसायने, बांधकाम उद्योग, ग्राहकोपयोगी नाशवंत वस्तू, खते, औद्योगिक उत्पादने, प्रसारमाध्यमे, औषधे, ऊर्जा, सॉफ्टवेअर, तयार कपडे, वाहतूक या व अशा सर्व प्रकारच्या उद्योगांचे समतोल प्रातिनिधित्व करतात; हे पाहण्याची जास्तीत जास्त काळजी घेण्यात आली आहे.


Sensex, BSE, NSE, AND NIFTY सेन्सेक्स/निफ्टी काढण्याची गणिती प्रक्रिया

Sensex, BSE, NSE, AND NIFTY in Marathi – फार खोलात न जाता (कारण त्याची खरेच काही गरज नाही) ढोबळमानाने इतकेच सांगून भागेल की, अशा प्रकारे निवडलेल्या या तीस कंपन्यांपैकी (निफ्टीच्या बाबतीत ५०१) प्रत्येकीचे एकूण जितके शेअर्स असतात त्या शेअर्सच्या संख्येला दर पंधरा सेकंदांनी त्या त्या क्षणीच्या त्या शेअर्सच्या बाजारदराने गुणले जाते. या रकमेला त्या कंपनीचे त्या क्षणाचे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतात.

Share Market Marathi

STOCK MARKET मध्ये फ्री मध्ये DEMAT ACCOUNT उघडण्यासाठी येथे क्लिक करा :- Click Here

Share Market बद्दल मराठीत update मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला like करा .

लार्ज कॅप’ Large Cap,स्मॉल-कॅप’ Small Cap,मिड-कॅप’ Mid Cap म्हणजे काय  ?

शेअर-बाजारात नोंदणी करताना ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असते त्यांना ‘लार्ज कॅप’ Large Cap कंपन्या म्हणतात. आणि ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन ३०० कोटी रुपयांपेक्षा कमी असते त्यांना ‘स्मॉल-कॅपSmall Cap कंपन्या म्हणतात. आणि ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पण ३,००० कोटी रुपयांपेक्षा कमी असते त्यांना ‘मिड-कॅपMid Cap कंपन्या म्हणतात. कंपनीचे सर्वच शेअर्स सर्वसामान्य माणसांसाठी मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध नसतात.
प्रत्येक कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी जितके शेअर्स प्रत्यक्ष खरेदी-विक्रीसाठी सर्वसामान्य माणसांना उपलब्ध असतात, त्या संख्येच्या आधारे प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा फ्री-फ्लोट फॅक्टर काढलेला असतो. त्या फ्री-फ्लोट फॅक्टरने कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशनला गुणले की कंपनीच्या फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनचा आकडा मिळतो. त्या सर्वच्या सर्व तीस कंपन्यांच्या फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनची नंतर बेरीज करण्यात येते.


१ एप्रिल १९७९ रोजी त्या वेळी सेन्सेक्ससाठी निवडलेल्या ३० कंपन्यांचे जे मार्केट कॅपिटलायझेशन होते, त्याचीही अशीच बेरीज करण्यात आली होती. त्या दिवशी १०० हा पायाभूत सेन्सेक्स इंडेक्स धरून त्यानुसार सेन्सेक्सचा इंडेक्स डिव्हायझरही ठरविण्यात आला आहे.
ज्या क्षणाला सेन्सेक्स काढायचा असतो त्या क्षणीच्या फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलाझेशनला इंडेक्स डिव्हायझरने भागले की त्या क्षणीचा सेन्सेक्स इंडेक्स येतो.
वाचलेले हे सारे विसरून जा यांतली एकही बाब तुम्ही क्षणभरसुद्धा लक्षात ठेवायची गरज नाही. पण तरीही मी ती प्रक्रिया मुद्दाम सांगितली आहे याचे कारण, मला तुमच्या मनावर एकच गोष्ट खोलवर बिंबवायची आहे; ती म्हणजे, सेन्सेक्स काढताना केवळ तीस निवडक आणि ठरावीक कंपन्यांच्याच शेअर्सचा हिशेब केला जातो (निफ्टीच्या बाबतीत पन्नास शेअर्सचा!) त्यामुळे सेन्सेक्सच्या आकड्यात जो काही फेरबदल होतो तो केवळ या तीस कंपन्यांशीच संबंधित असतो.
Sensex सेन्सेक्सचा पारा चढला तर बाकीच्या साऱ्याच्या साऱ्या साडेसात -आठ हजार कंपन्यांचा पारा चढलेलाच हवा आणि
सेन्सेक्स उतरला तर बाकीच्या साऱ्याच्या साऱ्या साडेसात-आठ हजार कंपन्यांचा पारा उतरलेलाच हवा, असे मुळीच नाही. कारण सेन्सेक्स किंवा निफ्टी काढताना बाकीच्या कंपन्यांच्या शेअर्समधील चढ-उतार लक्षातच घेतलेला नसतो.
सेन्सेक्स (Sensex) हे एका अर्थाने बघता केवळ त्या तीस कंपन्यांच्याच संपत्तीचे त्या क्षणाचे एकत्रित मूल्यांकन असते. १ एप्रिल १९७९ रोजी सेन्सेक्स इंडेक्स १०० होता आणि या क्षणी तो समजा १७,००० आहे; तर सर्वसामान्य माणसाने साध्या सोप्या पद्धतीने असे म्हणायला काहीच हरकत नाही की, १ एप्रिल १९७९ रोजी त्या ३० कंपन्यांचे एकत्रित मूल्य १०० रुपये होते आणि या क्षणी त्या ३० कंपन्यांचे एकत्रित मूल्य १७,००० रुपये आहे.
परिस्थितीनुसार प्रत्येक कंपनीचे मूल्य कमी-जास्त होत असते. त्यामुळे ३० कंपन्यांचे हे एकत्रित मूल्यही कमी-जास्त होत राहते. त्यामुळे सेन्सेक्स चढतो तेव्हा सुद्धा प्रत्येक वेळी त्यातील तीसच्या तीस कंपन्यांच्या शेअर्सच्या दरांमध्ये वाढ झालेली असतेच असे नाही आणि झाली असली तर ती वाढ समान असतेच असेही नाही. ही बाब सेन्सेक्स उतरतो तेव्हाही लागू आहे.
सेन्सेक्स (Sensex) उतरतो तेव्हा सुद्धा प्रत्येक वेळी त्यातील तीसच्या तीस कंपन्यांच्या शेअर्सच्या दरांमध्ये घट झालेली असेतच असे नाही आणि झाली असली तर ती घट समान असते असेही नाही.
सेन्सेक्समधील तीसच्या तीस कंपन्यांच्या दरात थोडी थोडी जरी वाढ झाली, तरी त्याचा एकत्रित परिणाम म्हणून सेन्सेक्सचा पारा खूपच वर चढतो, यात काहीच नवल नाही. या उलट, सेन्सेक्समधील तीसही कंपन्यांच्या दरात थोडी थोडी जरी घट झाली, तरी त्याचा एकत्रित परिणाम म्हणून सेन्सेक्सचा पारा खूपच खाली उतरतो, यातही काही नवल नाही.
पण जेव्हा तीसपैकी काही कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात घट असते आणि काही कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात वाढ झालेली असते, तेव्हा त्या दोन्हींच्या उलटसुलट दिशेच्या ओढाताणीत विचारा सेन्सेक्स त्या दोन्हीतील बलवान बाजूकडे किंचितसा झुकतो. अशा वेळी सेन्सेक्समधील वाढ वा घट अर्थातच मर्यादित असते.

आशा करतो कि तुम्हाला खालील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असणार . तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट द्वारे विचारा .

  • NIFTY म्हणजे काय ?
  •  BSE म्हणजे काय ?
  •  NIFTY म्हणजे काय ?
  •  NIFTY म्हणजे काय ?
  •  NSE म्हणजे काय ?
  •  Sensex कसा काढतात ?
  • NIFTY म्हणजे काय ?
#Sensex #nse #bse #sensexinmarathi #sensexpdf #sensexinhindi
error: Content is protected !!