श्री मयुरेश्वर मोरगांव Shri Mayureshwar Ganpati Mandir Morgaon
Mayureshwar Ganpati- हि अति प्राचीन देवता आहे . वेद कालापासून या देवतेची उपासना भारतातील सर्व प्रांतात केली जात आहे; पण असे जरी असले, तरी श्रीगणेशाची उपासना महाराष्ट्रात, विशेषत्वाने घरोघरी, तसेच सार्वजनिकरीत्या केली जात असते.
श्रीगणेश (Mayureshwar Ganpati) हे महाराष्ट्राचे अत्यंत आवडते दैवत आहे. पुराणांत एकवीस गणेशक्षेत्रे सांगितली आहेत आणि त्यातील अष्टविनायकाची आठ स्थाने महाराष्ट्रातच असून, त्यापैकी पांच पुणे जिल्हयात, दोन रायगड (कुलाबा) जिल्हयात व एक नगर जिल्हयात आहे.
अष्टविनायकाची नांवे ज्यांत ग्रथित केली आहे, तो श्लोक असा :-
स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिद ।
बल्लाळस्तु विनायकस्त्वथ मढे चितामणिस्थेवरे ।
लेण्याद्री गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ।
ग्रामे रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सता मङ्गलम् ॥
वरील श्लोक आपणा सर्वांच्या पाठांतरातील आहे. यांत प्रथमस्थानी मोरगांवच्या श्रीमयूरेश्वराचे नांव आहे.
Mayureshwar Ganpati श्रीमयूरेश्वराचा परिचय
मार्ग:- (Mayureshwar Ganpati) कडे जाण्यासाठी पुण्यापासून ४० मैलांवर (६४ कि. मीटर) असलेल्या हया क्षेत्रस्थानी जाण्यासाठी स्वारगेट हया बस स्थानकावरून सकाळी बस सुटते.
मोरगावी दर्शन, पूजन करून आपण संध्याकाळी परत येऊ शकतो. मुक्काम करावयाचा असल्यास, तेथे राहण्या-जेवणाची सोय होऊ शकते.
क्षेत्रमाहात्म्य :- श्रीगणेश सांप्रदायाचे मोरगांव हे आद्यपीठ मानले जाते. यालाच ‘भूस्वानंदभुवन’ असे म्हणतात.
पूर्वी येथे मोठया प्रमाणात मोर होते त्यावरून ह्या गावाचे नांव मोरगांव व तेथील दैवताचे नांव ‘ मयूरेश्वर’ पडले असावे असे म्हणतात.
कऱ्हा नदीच्या ठिकाणी वसलेल्या (Mayureshwar Ganpati) या क्षेत्री प्राचीन काळी ब्रह्मा,विष्णु, महेश, शक्ती व सूर्य या देवतांनी तप केले आणि त्यामुळे प्रसन्न होऊन श्रीगणेशाने त्यांना दर्शन दिले आणि त्यांच्या विनंती वरून तेथे कायम वास्तव्य करण्याचे मान्य केले.
या देवतांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येथे श्रीगणेशाची विधिपूर्वक स्थापना केली. तेव्हा प्रसन्न होऊन श्रीगणेशाने वरदान दिले की, जे माझी या क्षेत्री उपासना करतील, त्यांची विघ्ने मी हरण करीन.’
श्रीमयुरेश्वराची कथा:- मुद्गल पुराणांत या (Mayureshwar Ganpati) क्षेत्रासंबंधी एक कथा दिली आहे. ती अशी की, प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नांवाचा राजा राज्य करीत होता. सूर्याच्या उपासनेने त्याला पुत्रप्राप्ती झाली. पुत्राचे नांव सिंधू. त्यानेही तपश्चर्या करून अमरत्व प्राप्त करून घेतले व त्रैलोक्याचे राज्य मिळावे, या हेतूने प्रथम पृथ्वी काबीज केली व मग स्वर्गावर स्वारी करून देवांचा पराभव केला. श्रीविष्णूंनी त्याच्याशी युद्ध केले, पण त्याने त्यांना वश करून त्या नगरीतच राहण्यास सांगितले.
मग कैलास व सत्यलोकावरही स्वारी केली. सर्व देव श्रीगणेशास शरण गेले.शंकर कैलास सोडून मेरुपर्वतावर राहण्यास गेले. तेथे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती श्रीगणेशाची मूर्ती पूजीत असता, ती मूर्ती सजीव झाली आणि बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली की,’आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे’ व हयाचवेळी सिंधू.राजा तुझ्या नाशासाठी गणेशाचा अवतार झाला आहे,’ अशी आकाशवाणी झाली.
मग गणेशाने मोरावर बसून त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा पराभव करून सर्व देवांची मुक्तता केली
मोरयागोसावींची तपश्चर्या :- चिंचवडचे प्रसिद्ध मोरयागोसावी यांनी १४ व्या शतकांत येथे येऊन मोरयाची प्रखर उपासना केल्यावर, ब्रह्मकमंडलू तीर्थात त्यांना श्री गणेशाची मूर्ती मिळाली व स्यांनी त्याची स्थापना चिंचवड येथे भव्य मंदिर बांधून त्यात केली. तेव्हांपासून त्यांनी भाद्रपद आणि माधी चतुर्थीला मोरगांवची वारी सुरू केली .
श्रींचे मंदिर:- येथील मदिर भव्य असून सभोवती ५० फूट उंचीचा तट आहे. तटाच्या आतल्या चौकांत आठ कोपऱ्यात आठ गणेश प्रतिमा आहेत. २० फूट उंच चौथ-यावर श्रींचे मंदिर आहे. मंदिरा-पुढील चौकांत दीपमाळा आहेत. नगारखान्याच्या खाली श्रीमूर्ती-पुढे दोन पायावर उभा असलेला उंदीर आहे आणि त्याच्या आणखी पुढे दगडी चौथयावर श्रीसन्मुख असा एक भलामोठा नंदी आहे.
श्रीमूर्ती- श्रीगजाननाची भव्य मूर्ती पूर्वाभिमुख, बैठी व डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या डाव्या, उजव्या बाजूस ऋद्धि सिद्धि व पुढील बाजूस मूषक व मयूर आहेत. मूर्तीच्या डोळयांत व बेंबीत हिरे बसवले आहेत. हे अत्यंत जागृत देवस्थान आहे व येथे केलेल्या उपासनेचे फळ मिळते, अशी भाविकांची श्रद्धा व अनुभव आहे.
धार्मिक विधि व उत्सव – सकाळी श्रींची षोडशोपचार व रात्री पंचोपचार पूजा होते. मंदिर दर्शनासाठी सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत उघडे असते. श्रींचा थाटाने उत्सव साजरा केला जातो. आपणांस पूजा, अभिषेक वगैरे धार्मिक विधी उपाध्यायामार्फत करता येतात.
आजकालच्या जगात हिंसाचार प्रवृत्ती बळावली आहे. राष्ट्रा-राष्ट्रांत तणाव निर्माण झाले आहेत. जगाची पाऊले झपाट्याने विनाशाकडे पडत आहेत तेव्हा श्रीगजाननाने सर्वांना सुबुद्धि देऊन विश्वाचे मंगल करावे, अशी प्रार्थना करून व विनम्रतेने पुन्हा पुन्हा प्रणाम करून, श्रीगणेशाचे ध्यान अंतरी सांठवून, या क्षेत्राचा निरोप घतला.
अश्याच प्रकारच्या अनेक माहिती साठी भेट देत राहा www.blog24.org
Shrikant Vadnere is the chief Digital Marketing Expert and the Founder of Blog24.org,studyjobline.blog24.org and phyxzn.com He has a very deep Interest in all technology and Business related topics what so ever.