The Great Sambhaji Maharaj यांचे संपूर्ण चरित्र

            !! संभाजी महाराज यांचे संपूर्ण चरित्र  !!

Sambhaji Maharaj संभाजी महाराज  जयंती बद्दल त्यांचे संपूर्ण चरित्र-  ज्या मातेने हे स्वराज्याचे देखणे स्वप्न बघितले त्या राजमाता जिजाऊ माँ साहेब . ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यात उतरविले ते राजे शिव छत्रपती आणि ज्या महापुरुषाने हे सत्य आपल्या खांद्यावर पेलले या झेलले ते राजे शंभू छत्रपती या तीनही महापुरुषांना प्रथमतः आभिवादन करतो.

The Great Sambhaji Maharaj यांचे संपूर्ण चरित्र

Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराज जयंती

sambhaji maharaj jaynti wishes आपण आज ज्या मातीत उभे आहे हि तीच माती आहे जिने देवगिरीचा ७०० वर्ष पूर्वीच ऐश्वर्य संप्पन बिलोरी साम्राज्य पाहिलं ज्या मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथंच जन्म दिला.

इथंच माँ साहेब जिजाऊ बागडल्या इथंच शहाजी राजे रमले आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली आणि एका दिव्याच्या रूपात प्रकट झाली आणि तोच दिवा पुढं सह्याद्रीचा छावा झाला . खरतर ईतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे माणसं इतिहास घडवू शकत नाही हा सुद्धा एक इतिहास आहे.


निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावं आसा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला पण साक्षर मराठे त्या पासून बेदखल राहिले हि आमची शोकांतिका आहे .

खरतर आम्ही ज्या ,मातीत राहतो ती माती नेमकि कशी आहे ,ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमकी कसा आहे ,खरतर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र भक्तीच्या ऐलतिराचा शक्तीच्या तैलपीराचा महाराष्ट्र इथल्या मातीचा एखादा ढेकूण कधीतरी हातात घ्या आणि पाण्यात टाका त्या पाण्यावर जो लाल तवंग येईल ना तो सुद्धा या मातीसाठी खार्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा आसल  .

आजू बाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही  या सह्यादीच्या पायाखाली अशा कैक जणांनी स्वतःला गाडून घेतलय तेव्हा कुठं या सह्यादीची उंची या आसमंताला धडका देयाला  गेलाय .




आज सुद्धा छत्रपती शिवरायांचा नाव कानावर पडत आणि आमच्या शरीरावर रोमांच उठतात .

छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशी किलकारी कुठंतरी निनादते आणि आमच्या तोंडातून जय कधी बाहेर पडते हे आमचं सुद्धा आम्हाला कळत नाही जणू काही आमच्या धमन्यांतून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंब मध्ये  शिवाजी महाराज अजून जिवंत आहे, जणू काही इथल्या माती मध्ये जन्माला येणाऱ्या मुलाच्या भाळावर इथली माती शिवाजी हे तीन अक्षर लिहूनच त्याला जन्माला घते  कि काय  इतकी जादू या राजाची आहे.

आस काय केलं असेल या राजाने आसा काय निर्माण करून ठेवलं असेल . आरे साडेतीनशे वर्ष नंतर सुद्धा शिवरायांचं नाव ऐकून आमचं शरीर पेटत असेल साडेतीनशे वर्षानंतर शिवरायांचं नाव घेऊन आपल्याला उस्ताह येत असेल तर साडेतीनशे वर्ष पूर्वी खुद्द शिवरायांच्या पोटी येणार संभाजी राजा कसा असेल .

आरे कसा घडला असेल कसा उभा राहिला असेल कस असाल शौर्य कस   असाल धैर्य कस असल धाडस कस असल साहस,कसा असेल आभिमान कसा असेल स्वाभिमान कसा असेल पराक्रम आरे कस असल नेतृत्व कर्तृत्व व्यक्तित्व आरे कसा असेल संभाजी (Sambhaji Maharaj).

पण ज्यावेळेस  आपण गावरान माणसाला प्रश्न विचारतो की संभाजी महाराज कसे होते  तर तो सांगतो संभाजी महाराज रग्गेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते या  दोन शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास बदलून जातो इतिहासाने नाना आरोपांच्या फैरी झाडल्या त्यांच्यावर ,संभाजी (Sambhaji Maharaj) स्वैराचारी संभाजी रंगेल संभाजी राजांनी मराठेशाही बुडवली संभाजी महाराज  (Sambhaji Maharaj Nibandh) म्हणजे शिवरायांच्या पोटी आलेले नादान तख्तनशील वारीस .

संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) म्हणजे स्वराज्य द्रोही संभाजी महाराज म्हणजे मोगलांना जाऊन मिळालेले या नाना  आरोपांच्या फैरी झाडल्या बदनाम होत राहिले संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) गेली साडेतीनशे वर्ष काय वस्तू स्थिति काय खरा इतिहास, इतिहासाची पाने जेव्हा चाळतो पुरावे पाहतो तेव्हा कळतं.


संभाजी महाराजांची माहिती wikipedia वर हि बघू शकतात

संभाजी महाराजांचा जन्म sambhaji maharaj birth date

sambhaji maharaj birth date– १४ में १६५७ साली पुरंदरावर या शिवरात्नाचा जन्म झाला . आणि आपल्या जेष्ठ पुत्राची याद म्हणून माँ साहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं ” संभाजी ”बघता बघता संभाजींच्या बाळलीलेने सगळ्यांची मन हरकून जाऊ लागली.


संभाजींचा वय झालं सव्वा दोन वर्ष त्याच वेळी नियतीने गलति केली.संभाजी महाराज्यांच्या मातोश्री सई बाई महाराणी साहेबांचं निधन झालं,डोई वरच मातृत्वाचं छत्र हरपलं.

पिता शिवाजी राजे तर सदैव पाठीला मरण बांधून नेहमी मुलुख वर दौड घेणारे पित्याची छत्र छाया वाटेल येणार कशी पण याच वेळी सामने आल्या माँ साहेब जिजाऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाउ त नक्कीच आहे आस सांगत जिजामाता चालता बोलता विद्यापीठात उतरल्या संभाजी महाराज्यांच शिक्षण चालू झालं संभाजी महाराज लिहन वाचन शिकले संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) हसन खेळणं शिकले पळणं खेळणं शिकले.

बघता बघता नाना कला नाना विद्या संभाजी महाराजांना आत्मसात झाल्या  एक  नाही दोन नाही तीन नाही तब्बल सोळा भाष्या संभाजी महाराजांना यायला लागल्या मराठी येते उर्दू येते फारसी येते कानडी येते तामिळ येते मल्याळी येते हिगरु येते पाली येते,संस्कृत सुद्धा संभाजी राजांना येतेय.

राज्य शास्त्र,नीतिशास्त्र,धर्मशास्त्र,अर्थशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजी राजे तेज तरबेज झाले नुसता बुद्धीचाच गुण नव्हे तर त्याच वेळी काव्य गुण  सुद्धा त्यांनी जोपासला.

संभाजी राजांनी  (Sambhaji Maharaj) वयाच्या १४ व्या वर्षी बुधभुषणं नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये  लिहिला. नकशिका,नायिकाभेद,सातसतक यासारखे कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले.

आणि बघता बघता उत्तम कवी म्हणून संभाजीं राज्यांचा नाव लौकिक झाला . बुद्धीच कार्य क्षेत्र काबीज केलाच  पण त्याच वेळी शरीराचं सुद्धा केलं ,संभाजी महाराज नाना विद्या मध्ये व्यायाम मध्ये तेज तरः तरबेज झाले मल्यविद्या , भालाफेक ,तलवार बाजी  घोडेस्वारी यामध्ये संभाजी महाराजांनी मोठी हुकूमत पैदा केली,घोडेस्वारी मध्ये संभाजी महाराजांचा हात कोणी धरत नव्हतं .

तत्कालीन काळामध्ये घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि गर्रदिशी डोळ्याची पापणी मिटते तोवर फिरवणारा या जगाच्या पाठीवर एकच योद्धा झाला त्या योध्याच नाव होत संभाजी ,हि झेप बाकी कोणाला जमलीच नाही , बघता बघता संभाजींच्या या कर्तृत्व गुणांनी स्वराज्य मोहरत निघालं .

संभाजी राज्याचं येन जणू स्वराज्याला भाग्यशाली ठरलं.संभाजी महाराज्यांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढत वाढत गेलं.

प्रतिपचंद्र लेखेव ” प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरी प्रमाणे स्वराज्य संवर्धित होत गेलं. बघता बघता साडे आठ वर्षांचे झाले संभाजी महाराज त्याच वेळी स्वराज्यावर मिर्झा राजे जयसिंग यांचं आगमन झालं आणि छत्रपती शिवरायांना नाईलाजाने तह करावा लागला पुरंदरा सह तेवीस किल्ले बहाल करावे लागले आणि त्याच वेळी मिर्झा म्हणाला राजे आपले पुत्र  संभाजी राजे आमच्या कडे ओलीस म्हणून राहतील आणि वयाच्या साडे आठ व्या वर्षी संभाजी मोगलांकडे ओलीस म्हणू राहिले.

त्याच वेळी शिवरायांना आग्र्याला बोलावलंय सोबत मनसबदार म्हणून   संभाजी महाराजांना घेऊन.आणि त्याच वेळी शिवरायांनी संभाजींच्या  शिक्षणाच्या दृष्टीनं हा फैसला महत्वाचा मांडला .

याच काळात सोबत निल तर संभाजी राजे मोगली रियासतीचा,मोगली दरबारीचा,औरंगजेबाच्या राजकारणाचा यथाकाल अभ्यास करू शकतील.आणि शिवराय आणि संभाजी राजे औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले पण इथंच औरंगजेबाने जहरी चाल खेळली .

शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि स्वराज्याचा नरसिह खवळला आणि बघता बघता भर दरबारात बाणेदार पणे औरंजेबाला  फटकारून उभा राहिला भर दरबार कापत राहिला मोगलांच्या दरबारात जाऊन मोगलांची दाणादाण शिवरायांनी उडवून टाकली आणि फाटकारून सरळ चालते झाले.


पण त्याच वेळी औरंगजेबानी जहरी चाल खेळली  शिवरायांच्या भोवतीचे पहारे कडक केले  आणि शिवरायांना कळून चुकलं कि आता औरंगजेबाच्या मगर मिठीतुन सुटका नाही आणि त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं कि सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावर नाही खेळल्या जात काही लढाया बुद्धीच्या बळावर सुद्धा खेळाव्या लागतात,तलवारीच्या पात्याला एकदा बुद्धीची धार चिकटली कि मग शौर्य लकलकत.

आणि चाल आखली जाऊ लागली एके दिवशी भर दरबारात औरंगजेबाने संभाजी महाराज्याना विचारले संभाजी राजे आपण उत्तम मल्यविद्या  जाणत आहत आस आम्ही ऐकून आहे आपण उत्तम कुस्ती खेळता आस आम्ही ऐकून आहे मग आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का,आणि तस नऊ वर्षाचा छावा कडाडला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही.


महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाजी राज्यांनी नवव्या वर्षीच औरंगजरेबला दाखवून दिला . आणि बघता बघता दिवस उजाडला आणि जे स्वप्नतही शक्य होणार नाही ते शिवरायांनी सत्यात उतरविल आणि महाराष्ट्राचा नरसिह सुटला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला .

यथाकाल राजे निसटले राजगडावर पोहचले आणि पोहचल्या पोहचल्या त्यांनी वार्ता उठवली वाटेत संभाजी राज्याचं निधन झालं वयाच्या नवव्या वर्षी संभाजी महाराज्यांच्या पाठीवर जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीने सामुरे जाईपर्यंत त्यांची अशीच सोबत करत राहील पण शिरायानी उडवली होती हूल राजगडावर तर संभाजी महाराज्यांच्या अंत्यविधी सुद्धा झाले येसू बाई सती जायला निघाल्या, जिजाऊ तर रडून रडून थकल्या पण सगळी चाल शिवरायांनी आपल्या मनात दाबून ठेवली होती.

आणि संभाजी राजे सुखरूप गडावर पोहचले पण गेलेला शंभूराजा वेगळा होता आणि आलेला शंभूराजा वेगळा होता,परत आला होता धाकला धनी ,जाणता , परिपकव झालेला ,मोगली रियासतीचा ,राजकारणाचा अभ्यास करून तयार झालेला संभाजी राजा.

वय वर्ष झालं दहा त्याच वेळी शिवरायांनी संभाजी राजांना विचारलं संभाजी राजे आपण लेखणी तेज चालवता पण आपली तलवार  , आणि उसळला छावा  ,आज्ञा द्यावी आबासाहेब.

आणि आज्ञा दिली गुजरात खांबाक प्रांत टिपण्याची आणि दहा हजाराची फौज घेऊन संभाजी राजा कोसळला गुजरात वर खांबाईक टिपलं भागानगर लुटलं अनेक जण कैद केले आणि स्वतःच्या शौर्याची मोहर स्वराज्यावर उमटली आणि त्यांच्या युद्ध नीतीने अनेकांच्या नजर विस्तारून गेल्या

शिवरायांना बातमी  कळाली  आणि  कडाडले शिवराय, द्या बत्ती तोफांना  आमचा बछडा जीत घेऊन रायगड जवळ करतोय आणि स्वराज्यावर  संभाजींचा पराक्रम उमटला आणि लेखणीच्या,बुध्दिच्याच नव्हे तर मनगटाच्या परीक्षेत सुद्धा Sambhaji Maharaj संभाजी राजे अव्वल आले.

आता जे जे खटले शिवरायांच्या न्यायालयापुढे यायचे ते आता शिवराय धर्म पंडित असणाऱ्या संभाजींकडे द्यायला लागले आणि बघता बघता त्यांचे न्याय लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले .

यथाकाल संभाजी महाराज्यांच वय झालं सतरा वर्ष आणि महाराष्ट्र एका नवीन जाणिवेच्या आनंदाला आतुर झाला रायगड आनंदाने न्हाहला होता.

शिवाजी महाराजांचा रायगडावर शिवराज्याभिषेक …

Sambhaji Maharaj- कारण होत शिवरायांचा राज्याभिषेक सातशे वर्षा पूर्वीचा घनदाट अंधार हटवून राजे  छत्रपती होणार होते आणि रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला

साडे सातशे वर्षा पूर्वीचा अंधार हटवला,लोकशाही राज्य निर्माण झालं, लोक कल्याणकारी राज्य निर्माण झालं ,शिव कल्याणकारी राज्य निर्माण झालं,शिवशाही उतरली रयतेच्या डोळ्याच्या कडा आनंदाने पाणावल्या कारण राजा छत्रपती झाला पण त्याच वेळी  इतिहासात आणखी एक घटना घडली आता पर्यंत मराठ्यांची पोर सरदार पुत्र म्हणून ओळखली जात होती,पण आता संभाजी पहिले छत्रपती पुत्र ठरले,संभाजी राजे पहिले युवराज झाले.

एक अत्यंत शिवरायांना अपेक्षित असणारा वारसदार या महाराष्ट्राच्या मातीने महाराष्ट्राला बहाल केलाय ज्यानं स्वराज्य,स्वराज्य उभं केलंय.

शिवरायांचं निधन झालं

३ एप्रिल १६८०  शिवरायांचं निधन झालं त्या वेळी संभाजी पन्हाळ्यावर होते .  रायगडावर संभांजी राजे आले ,शिवरायांचे अंत्यविधी पूर्ण करून करून घेतले . रायगडावर शिवरायांची समाधी उभारली आणि स्वराज्याची घडी नीट बसवून तब्बल नऊ महिन्यांनी स्वतःचा राज्याभिषेक (Sambhaji Maharaj Rajybhishekh) करून घेतला.

Sambhaji Maharaj- संभाजी राजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले पण त्याच वेळी महाराष्ट्राचं आभाळ काळवंडल होत एके दिवशी संभाजींनी सरलष्करांना विचारलं , मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण या औरंग्याचा सुद्धा थाट उतरला पाहिजे.

जागा शोधा मोक्याची आणि हंबीररावांनी जागा शोधली अगदी मोक्याची एक जागा आहे ‘ बुऱ्हाणपूर बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाची दक्खनेतील राजधानी  ऐश्वर्य ,संपत्ती ,सामर्थ्य  आफाट … आणि त्याच वेळी कडाडला छावा ,मग टाका छापा त्या बुऱ्हाणपुरावर करा कोळसा पुरा त्याचा आणि सुटले ,मराठे  आणि मराठयानी बुऱ्हाणपूर पूर्ण धुतलं त्याच वेळी औरंगजेबाला दुसरा तडाखा बसला ”औरंगाबाद ” औरंगजेबाच्या नावाने बसवलेलं औरंगाबाद संभाजी महाराज्यांनी त्यालाच हात घातला.



इतकं धुतलं इतकं धुतलं कि औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं दुसरं काही ठेवलाच नाही . औरंगजेब तडफ़डाला भयाण वैतागला पण त्याच वेळी त्याला तिसरा तडाखा बसला .

त्याचाच मुलगा अकबर त्याच्या विरोधात उठला आणि सरळ आला महाराष्ट्रात कारण त्याला माहिती आहे या पुऱ्या पुऱ्या हिंदुस्थानात औरंगजेबशी झुंझ घेईल आसा एकच मर्द सर्जा आहे  ” संभाजी  ” . आणि संभाजी महाराज्यांनी  याच अकबराला हाताशी घेतलं आणि पुढच्या चाली खेळायला सुरवात केली.

पण लागोपाठ तीन तडाखे बसलेला औरंगजेब चौताळून उठला आणि उचलली पाऊल त्यांनी दख्खन वर ,औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे आशिया खंडातील सगळ्यात मोठं साम्राज्य,आणि संभाजींचं स्वराज्य आशिया खंडातील सगळ्यात छोट स्वराज्य , मन भर सैन्य कण भर मराठ्यांना चिरडायला निघालं आणि बघता बघता संभाजी सज्ज्य झाला वय वर्ष अवघ तेवीस.

आणि संभाजी महाराज्यांच्या नेतृत्वा खाली मराठे सुसाट सुटले जिथं भेटलं तिथे मोगलांना कापत कापत निघाले औरंबागजेब चोही बाजूने फक्त शिकस्ती च्या बातम्या ऐकत राहिला हार पराभव हार पराभव .

अरे तेवीस वर्षाचा संभाजी राजा (Sambhaji Maharaj) मोघलांना पार सळो कि पळो करून सोडलं औरंगजेबाने मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्धची मोहीम उघडली पण संभाजी महाराजांनी त्याची पूर्ती वाट,वाट,वाट लावली.

आणि कडाडला संभाजी राजा (Sambhaji Maharaj) ” आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटे वर जाऊन त्याची वाट लावल्या शिवाय  आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही ” आणि मराठे कापत कापत निघाले .

तेव्हा  औरंगजेबानी  नाशिक जिल्ह्यातील असणाऱ्या दिंडोरी पासून अवघ्या  दहा मैलावर असणाऱ्या ” रामशेज ” नावाच्या किल्ल्यावर आक्रमण केले  त्या किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते औरंगजेब विजयाची बातमी ऐकायला आतुर झाला होता पण तो किल्ला मराठ्यांनी फक्त सहाशे मावळ्यांसोबत सहा वर्ष लढवला .

शेवटी मोघल वैतागून माघारी निघून गेले आणि रामशेज गड अजिंक्यच राहिला . शिवराय म्हणायचे माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी एक वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला साडेतीनशे वर्ष लागतील.

पण संभाजी राज्यांनी एकच रामशेज नावाचा किल्ला सहा वर्ष लढवला सहा गुणिले साडेतीनशे औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील आणि औरंगजेबानी त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली,जो पर्यंत त्या संभाजीला (Sambhaji Maharaj) पराभूत करत या गिरफ्तार करत नाही तो पर्यंत बादशाही पदाची हि पगडी घालणार नाही , इथंच महाराष्ट्रात मेला  औरंगजेब पण मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती मरे पर्यंत संभाजीराज्यांनी त्याला ते भाग्य मिळूच दिल नाही.

औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठंच नव्हता हि सगळी ताकत या  सव्वीस वर्षाच्या संभाजीची आफाट ताकतीने औरंग्याला रोखलंय पुऱ्या दख्खन मधला एक खण नाही घेऊ दिला .

पण मात्र आता औरंगजेबानं जाळ टाकलं जंजिऱ्याच्या सिद्धीला त्याने उकसवल चालून जा मराठ्यांवर ,पोर्तुगीजांना फितवले चाल करा मराठ्यांवर ,इंग्रज हाताशी धरले आक्रमण करा मराठ्यांवर,हाफशी,पोर्तुगीज,इंग्रज,मोघल.

एक नाही दोन नाही तब्बल बारा गडप उगारल्या स्वराज्याच्या विरोधात आणि या सगळ्यांना संभाजी राजा पाणी पाजत राहिला युद्ध करत राहिला नऊ वर्ष तब्बल नऊ वर्ष  संभाजी राजांनी तब्बल १४० लढाया केल्या .

पण एकही लढाईत पराभूत न होणारा  राजा म्हणून गिनीज बुकमध्ये सुद्धा संभाजी राज्यांचीच नोंद आहे .

कधी हरला नाही माग फिरला नाही तह केला नाहि नमला नाही झुकला नाही . वाकला नाही आजिबात नाही जो झेपावत राहिला आदिम उत्साहाने,आफाट  ताकतीने प्रचंड शौर्याने आपण शिव छत्रपतींचे पुत्र आहे या धारणेनें , संवर्धित करत राहिला आहे स्वराज्य आफाट ताकतीने एवढाच नाही कर्नाटकात गेले कर्नाटक मुठीत घेतलय,त्रिवेंदम,त्रिचनापल्ली,मद्रास,कावेरी नदी ओलांडली आहे तो पाषाण कोट जिंकलाय वाऱ्यासारखा फिरतोय नुसता राजा.

तोवर औरंगजेब आदिलशाही कड वळाला आदिलशाही त्यांनी सहा महिन्यात जिंकली मग वळला कुतुबशाही कड कुतुबशाही त्यांनी अवघ्या एका महिन्यात जिंकली , आणि  संभाजी राज्याचं स्वराज्य जिंकायला  त्याला  नऊ वर्ष शक्य होत नाही , हे शौर्य कोणाचं हे धैर्य कोणाचा ,सर्जा संभाजी राजाच (Sambhaji Maharaj) , संभाजी महाराजांनी मराठी सैन्य पाच पट सहा पट वाढवलंय.

चोहीबाजूने सुरक्षित केलय स्वराज्य.  टाप  नाही कोणाची स्वराज्यावर तिरक्या नजरेने बघायची . पण  औरंगजेबाने आदिलशाही जिंकली कुतुबशाही जिंकली आणि मग त्याला परत उत्साह आला आणि  म्हणाला ” पुरे हिंदुस्तान कें आलमगीर होना चाहते हे हम ”हा दक्खन फक्त खटकतोय . त्याला वाटलं होत संभाजी म्हणजे शिवाजीच्या पोटी आलेला नादान तख्तनशील वारीस , बदलला अनुमान .

शिवाजी राजांपेक्षा दहा पटीने तापदायक आहे संभाजी पण औरंगजेबाला माहिती होत उघड्या मैदानावर संभाजीला आपण पराभूत करूच शकत नाही .मग  आखला डाव ,फितुरांना पुन्हा मदतीला घेतलं . संभाजी राजे होते त्या वेळी रायगडावर , रायगड म्हणजे गरुडाच्या बस्कनी सारखा वाऱ्यालाही जिथं आत शिरता येणार नाही आणि आत पडलेलं वार  बाहेर पडणार नाही इतका बुलंद आणि बेदाब , या रायगडावरून संभाजींना पकडणं हरवणं मुश्किल आणि मग औरंगजेबानी डाव आखला  संभाजीला रायगडाच्या बाहेर काढा.

आणि फितूर मदतीला आले गणोजी शिर्के संभाजी (Sambhaji Maharaj) राज्यांचे मेहुणे ,वतनाचा न दिल्याचा राग त्यांचा  त्यांचे खटले कवी कलाशाकडे होते .

देसाई, सावंत, शिर्के यांचे खटले कवी कलशांपुढे आले या फितुरांनी शिर्केंची समजूत करून दिली कि कवी कलश तुमच्या विरोधात, आणि त्या दिवशी कवी कलशांची खटल्याचा निकाल नेमकी सावंतांच्या  बाजूने दिला,आणि शिर्केंची खात्री पटली . कवि कलश विरोधातच, शिर्के सरळ कवी कलशांवर चालून गेले आणि कवी कलश प्राण वाचून विशाल गडावर आले आणि संभाजी राज्यांना खलिता पाठवला शिर्केनी मार  दिला .

आणि संभाजी कडाडले ” नात्याची पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावं आम्ही विचारांती झाली (sambhaji maharaj wife name Yesubai) येसू बाईंना आणि येसू बाई म्हणाल्या ” सौभाग्याला स्वराज्य आणि स्वराज्याला सौभाग्य मानतो आम्ही ” नात्याची पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर बिनघोर निघा राजे भले ते आमचे बंधू असले म्हणून काय झाले .

स्वराज्याची स्वामींनी कडाडली आणि स्वामी सज्ज झाला शिरक्यांवर तुटून पडला शिर्क्यांच शिरकाण्ड केलं शिर्के पळून गेले आणि मग संभाजी आले पन्हाळ्यावर .

पण संभाजींना कानोकानी खबर नव्हती कि आपण औरंगजेबाच्या जहरी चालीत फसत निघालोय .

औरंगजेबाची चाल यशस्वी झाली होती संभाजी रायगडाच्या बाहेर पडले होते .

आणि पन्हाळ्यावर आले होते पन्हाळ्यावर होते सरलष्कर सेनापती ” मालोजी घोरपडे ” वय वर्ष साठ शरीर थकलं असल  पण मनगटातील रग आणि छातीतील धग आजून विझली नव्हती .

पण त्याच वेळी हेर धावत आला संभाजींना सांगता झाला राज .. राज .. रायगडाला यतिगत खानाचा घेर पडलाय.

काळजाचा ठोका चुकला रायगड म्हणजे राजधानी , महाराणी तिथं आहे , बाळराजे तिथं आहे , स्वराज्य सिहांसन तिथं आहे.

कोणी डाव्यांन डाव मांडला आणि संभाजीराजे निघाले मालोजींना सांगते झाले  लागली गरज तर हाक मारू  लगेच येऊन मिळा  आम्हास. संभाजी राजे अवघ्या  शंभर भलायतांसोबत निघाले रायगडाकडे ,पण त्याच पूर्वीच  औरंगजेबाचा  खलिता मुकर्रब खान कडे आलाय  तो संभाजी (Sambhaji Maharaj) पन्हाळ्यावर आलाय आता नामी संधी आहे .

आणि तीच बातमी घेऊन मुकब्बर खानाने रायगडाकडे जाणाऱ्या सर्व वाटा बंद करून टाकल्या एका वाट होती गर्द बिकट वहिवाट संभाजी राज्यांनी तीच वाट निवडली  संगमेश्वराची पण मुकर्रब खानाने पेरून ठेवले होते फितूर तिथंच आणि आले संभाजी संगमेश्वरला .

मुकर्रब खानाला पक्की बातमी मिळाली आणि मुकर्रब खान निघाला पाच हजार सैन्य सोबत संगमेश्वराच्या दिशेनी पन्हाळ्याला बगल देत , पन्हाळा अंधारात गुडूप झालेला , पहारेकरी पहारा देत होता अचानक काहीतरी दिसलं आणि चमकल आणि मग समजलं मुकर्रब खान चाललंय राज्यांच्या माग आणि बघता बघता पाचशे मावळा सज्ज झाला मुकर्रब खानाच्या सैन्याला बगल देत मालोंजी बाबा संगमवश्वाराच्या दिशेनी  दौडू लागला आपल्या राज्याच्या रक्षणासाठी  आला संगमेश्वराच्या वेशीवर आणि राज्यांना सांगता झाला राज निघा निघा राज नावाडी जवळ करा .

संभाजी म्हणाले काय झालं मालोजी आणि मालोजी म्हणाला गनिमांनी डाव गरबडला  राज , राज निघा मग संभाजी राजे (Sambhaji Maharaj) म्हणाले तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपवून जायला राजे नाही झालो आम्ही मरू इथंच पण रण  टाकून पाळणार नाही पण त्याच वेळी मुकर्रब खानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडली.

आफाट सेनासागर आणि टिच भर पाचशे मावळा राज्याच्या रक्षणासाठी सज्ज आहे आणि मुकर्रब खानाने मराठ्यांचं टिच भर सैन्य बघितलं आणि कडाडला एल्गार आणि हरहर महादेवाची आरोळी घुमली बघता बघता तलवारी खणाणू लागल्या आरे एक एक मावळा लढत होता मोगलांना सपासप कापत होता.

शिवराय म्हणायचे माझा एक मावळा शंभराला भारी आहे पण इथं एक मावळा पाचशेला भारी पडत होता आपल्या राज्या साठी इथं एक एक गडकोटा  सारखा लढत होता , स्वतः साठ  वर्षाचा मालोजी दोन्ही हातात समशेरी घेऊन लढतोय.

अफाट ताकतीने येईल त्याला सरळ कापतोय नुसता खच प्रेतांचा,गुळाच्या ढेपाळ मुंगया डासाच्या तस सगळं मोगली सैन्य मावळ्यांना डसल .

आणि यवनी  सैन्य सुटलं संभाजींच्या माग पण संभाजींनी (Sambhaji Maharaj) आगोदरच सांगितलं होत जमलं तस जमल तिथून निसटायचं सगळ्यांनी , आणि संभाजी नावडी नदीच्या दिशेने निसटायला लागले तेव्हड्यातच  कवी कलश घोड्यावरून खाली पडले आणि संभाजी (Sambhaji Maharaj) परत कवी कलशांना घ्यायला मागे वळाले ,आणि संभाजी आणि कवी कलश आले नावडीच्या  किनाऱ्यावर  समोर काही मानस दिसली संभाजींना आपली वाटली पण सगळी फितूर निघाली .

चोहू बाजूने संभाजी राजा अडकला गेला चोहू  बाजूने यवनी  सैन्य गोळा झालं ,अखेर चोहू  बाजूने दोरखंड फेकले आणि संभाजी राजे अडकले गेले ,छावा संभाजी राजा अडकला गेला.

फितुरांची चाल यशस्वी झाली होती पण संभाजींच (Sambhaji Maharaj) मस्तक ताटच होत आणि संगमेश्वर ते बहादूरगड हे साडेतीनशे मैलाच अंतर आहे मुकर्रब खानाने संभाजी राज्यांना  घेऊन हे अंतर  अवघ्या साडेचार दिवसात पूर्ण केलं होत  कुत्रा माग लागल्या सारखा पळत होता मुकर्रब पण दुर्दैव मराठ्यांच ,किल्ल्याच्या तटाशेजारून संभाजींना नेलं जात होत पण किल्याच्या धारकार्याला माहित नव्हतं कि आपला राजा कैद झाला आहे. गावाच्या वेशीवरून संभाजी राजांना नेलं जात होत पण गावाच्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहित नव्हतं कि आपला राजा कैद झालाय .

कळे पर्यंत संभाजी राज्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होत आणि औरंगजेब पर्यंत खबर पोहचली आणि औरंगजेब खूप खुश झाला आणि कडाडला औरंगजेब आतापर्यंत संभाजींनी (Sambhaji Maharaj) आपल्या खांद्यावर मराठी तख्त पेलला असलं  पण आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा ,आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील पण आता त्याला विदुषकी झबली घाला,आतापर्यंत त्यांनी डोक्यावर जिरेटोप मिरवला आसल  पण आता त्याच्या डोक्यावर घुंगरू असलेली  विदुषकी टोपी घाला .

आतापर्यंत त्यांनी राज अलंकार घातले असतील पण आता त्यांला पोलादी, काटेरी साखळदंडांनी जखडवा,आतापर्यंत तो पालखीत,मेणातून,हत्तीच्या अंबारीतून फिरला असल,पण आता त्याला उंटाला बांधा,आता पर्यंत राजा आला म्हणून नगाडे  वाजले असतील पण आता ढोल ताशे वाजवायला सुरवात करा.

कळूद्या महाराष्ट्राला आलमगीर औरंगजेबानी संभाजी गिरफ्तार केलाय .  आणि निघाली दिंड विदुषकी झबली घातली,घुंगरू असलेली टोपी घातली,पोलादी काटेरी साखळदंडांनी जखडवल ,उंटाला बांधलं आणि निघाली दिंड वाजत गाजत.

सगळ्या मोगली चवळीत कल्लोळ माजला होता सगळे आतुरले होते ज्यांनी नऊ वर्ष औरंगजेबाला झुंजवत ठेवलं तो संभाजी आहे कसा दिसतो कसा,कोण कोणाच्या डोक्यावर कोण कोणाच्या खांद्यावर घरावर उभे राहून बघत होते कसा आहे संभाजी . आणि अचानक कुठूनतरी भिरभिरणारा दगड यायचा संभाजींच्या छातीवर आदळायचा रक्ताची चिळकांडी आतनेचा  कल्लोळ उडायचा,कोणीतरी यायचं उंटाची शेपटी पिरगाळायचं उंट थयथया नाचायचा आणि अंगावरचे काटेरी साखळदंड टोचायचे बोचायचे  जागोजागी  जखमा करायचे .

कोणीतरी यायचं अंगावर थुंकायचं कोणीतरी यायचं एखादी शिवी द्यायचं ,कोणीतरी यायचं तलवारीने संभाजींच्या अंगावर रेषा उमटायचे रेषे बरोबर रक्ताची धार लागायची मातीवर रक्त रक्त मुद्रा उमटत जायच्या  कोणी सोसलं एवढं  कोणी सहन केलं .

जर संभाजी राजे (chhatrapati sambhaji maharaj) झुकले असते  नमले असते  तर सुखात जगले असते मग का नाही  केल  आस , स्वराज्य साठी मराठी अस्मितेसाठी रयते साठी .

झुकली नाही मान वाकला नाही कणा आणि त्याच बाणेदार पणे आला औरंगजेबाच्या दरबारात,संभाजींना दरबारात आणण्यात आलं आणि औरंगजेब तख्तावरून उतरून संभाजींपुढं आला संभाजींना  (Sambhaji Maharaj) एकदा नीट  न्याहाळलं आणि नजर स्थिरावली डोळ्यांवर आणि औरंगजेब म्हणाला नों बरस का था तब मिला था ये हमे  आग्रामे तब पूछा था हमने  ईसे क्यो रे संभा तुम्हे हमारा डर नही लगता,तब ईस  संभा ने हमें जवाब दिया था हमे  किसीका डर नही लगता लेकिन हमारे वझसे सबको डर लगता.

सच कहा था गाफर ने कभी,कभी थंडक नहि मिलने दि . लेकिन अब नही अब नही  आखिर आज तू कैद मे हे हमारी . आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुढगे टेकून खाली बसला नमाजाच्या रुखात. आणि हे दृश्य बघून संभाजी कवी कलशांना म्हणाले कवीजी कवी आहात आपण मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता.

आणि कवी जी म्हणाले हा राजे आयका ” राजन तुम हो सांजे खूब लढे तुम जंग देख तुम्हारा तेज तख्त तजत  औरंग ”  अहो राजे काय लढलात तुम्ही जंग काय तुमचं शौर्य काय तुमचं तेज , तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतः स्वतःच सिहासन त्यागून तुमच्या पुढं येऊन गुढगे टेकून बसलाय , आणि कडाडला औरंगजेब खामोश …  आणि  औरंगजेब संभाजींना (Sambhaji Maharaj) विचारू लागला बताओ  संभा कहा रखी हे लूट  कहा छुपाया हे खजाना , आणि कडाडला छावा इथल्या मातीचा कण कण  मानतो आम्ही सोना औरंग्या तू गीळलास खजाना गीळलास  हिंदुस्थान पण आम्ही मागणार नाही तुझ्या सारखे होणार नाही भिकारी .

आरे हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्या सारख्याला घेत नाही आसा आरे घेऊ ते फक्त मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर याद राख.

तडफडत राहिला औरंगजेब आणि म्हणाला ये मराठे क्या खिलाते हे अपने बच्चोंको क्यू पैदा नही हुवा ऐसा एक भी शक्स हमारे घराणे मे,आरे हे मराठे आपल्या मुलांना काय खायला घालतात का आस एक तरी पोर माझ्या घरात नाही जन्माला आलं  आणि मग संभाजी (Sambhaji Maharaj) म्हणाले आरे कसा येईल तुझ्या पोटी संभाजी , संभाजी जन्मेन  फक्त शिवरायांच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच ,  आरे  स्वतःच्या बापाला विष देणारा तू , स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू तुझ्या पोटी कसा येई संभाजी .

संभाजी येईल फक्त सह्याद्रीच्या काड्यांवरच याद राख महाराष्ट्राच्या मातीस उभा आहेस तू आणि विचारलं औरंगजेबानी बता ओ संभा हमारे कोण कोणसे  सरदार शामिल थे तुम्हे,आणि कडाडला छावा  आरे तख्ता साठी रक्ता वर उलटणारी जात नाही आमुची ,आणि संतापला औरंगजेब आणि म्हनाला ले जाओ  हमारे नजरोके  सामनेसे  निकाल दो ये आंखे घुरती बहोत हे, काट डालो  ये जबान ,जबान बोलती बहोत हे ……जाओ .

औरंगजेबानी त्याच्या मृत्यू पत्रात  लिहून ठेवलय पहिली चूक केली शहाजान न त्यांनी शहाजी राज्यांना कर्नाटकात जिवंत राहू दिल,शाहजीच माराला आसता तर शिवाजी उभाच राहिला नसता, दुसरी चूक मी केली आग्र्याच्या भेटीतून शिवाजीला जिवंत जाऊ दिल शिवाजी मारला आसता तर संभाजी खडाच राहिला नसता  आता दोन चुका झाल्या आणि आता संभाजींना (Sambhaji Maharaj) जिवंत सोडून मी  तिसरी चूक करणार नाही.

अखेर वधुबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजींना (Sambhaji Maharaj) बांधण्यात आलं . आणि औरंगजेबाच्या सजेचा अम्मल सुरु झाला आणि आज्ञा आली डोळे काढायची.

संभाजी महाराजांचा मुर्त्यू (sambhaji maharaj death history)

संभाजी (sambhaji raje death history) बघताय दोन हाफशी येतायेत समोरून ,हातात लालबुंद झालेल्या सळ्या  धुरांच्या रेषा हवेत सोड्तायेत संभाजींना कळून चुकलं डोळे जाणार  आता संभाजींनी मिटले नेत्र आणि डोळ्यासमोर  उभे राहिले आबा  साहेब , माँ साहेब,आऊसाहेब ,हे स्वराज्य ,मावळे आरे हेच डोळे याच डोळ्यांनी घेतलं दर्शन स्वराज्यच , आबा साहेबांचं ,आई भवानी च आणि उघडले डोळे आणि समोर दिसल्या लालबुंद तप्त सळया आल्या पुढं घुसल्या आत चर्रर्रर्रर्रर्र   दिशी नुसता  गोंगावला  सळया गेल्या  आत आणि त्याच वेगानं बाहेर आल्या डोळे नव्हतेच  कुठं उरल्या होत्या त्या फक्त काळ्या कबिनं खोबण्या धूर बाहेर फेकणाऱ्या .

पायात काटा घुसल्या वर चार दिवस पाय धरून बसतो आपण ,राज्यांच्या डोळ्यात लालबुंद तप्त सळया घुसल्या किती किती वेदना झाल्या  असतील  किती त्रास झाला असेल .

तो पर्यंत सजेचा दुसरा अम्मल चालू झाला जबान छाटायची आज्ञा  आली . , आणि हाफशी  लखलखती नंगी तलवार घेऊन , आले संभाजींची जीभ कापायला पण संभाजींचा तोंड बंद आहे जीभ  कापणार कशी एक हाफशी पुढं गेला तोंड उघडायचे प्रयत्न करू लागला पण संभाजी (Sambhaji Maharaj) तोंड उघडायला तयार नव्हते मग संभाजींच्या कानावर दाब दिला,मस्तकावर दाब दिला तरीही जबडा उघडेना , पण त्याच वेळी एकांन  युक्ती केली पुढं जाऊन संभाजींचं नाक दाबून धरलं ,  संभाजींचा श्वास गुदमरला श्वासा साठी तळमळ तगमक झाली , श्वास साठी होट  हलले जीभ लवलवली  आणि त्याच संधीचा घेतला फायदा सांडशी घुसली आत सांडशीत पकडली जीभ ओढली बाहेर  नंगी तलवार लखलखती आणि क्षणात जीभ कापण्यात  आली  आणि संभाजींच्या तोंडातून ओघळल लालबुंद रक्त उभ्या शरीराचा रक्ताने आभिषेक झाला.  जीभ पडली होती समोर वळवळत ती जीभ सुद्धा तयार नव्हती संभाजींपासून पोरकं व्हायला.

ज्या जिभेने उमटवले जगदंब जगदंब चे बोल,ज्या जिभेनी दिली किलकारी हरहर महादेवची ,ज्या जिभेने केला जागर जय भवानीचा ,जी जीभ म्हणत  राहिली आऊसाहेब ,आबासाहेब  तीच जीभ पडली होती समोर वळवळत.

एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस अनन्वित अत्याचार चालू होते या राजावर. बोकड सोलाव आस संभाजींचा (Sambhaji Maharaj) कातडं सोलून काढलं त्यावर मिठाचं पाणी फेकलं , कोणीतरी यायचं संभाजींच्या घुडग्याच्या वाट्या काढायचं कोणीतरी यायचं संभाजीचे बोट छाटायचे , तलवारीच्या पात्याने अंगावरच मास कापायचे कुत्र्या गिधाडांना खाऊ  घालायचे.

कुणी बघितलं असत तर म्हटलं नसते कि मराठ्यांचा छत्रपती आहे  हे ,इतकी खराब अवस्था संभाजी महाराज्यांची केली होती.

संभाजी (sambhaji raje bhosale) सहन करत राहिले सगळं आपल्या स्वराज्या साठी या रयते साठी , राष्ट्रधर्मा साठी . अखेर उगवली फाल्गुनी वैद्य आमावस्या ११ मार्च १६८९ , औरंगजेबाची शेवटची आज्ञा आली संभाजींचं मस्तक कलम करा  आणि संभाजींचं मस्तक कापलं गेलं ते भाल्याच्या टोकाला अडकवलं .

आणि (Death of sambhaji Maharaj) गुढीपाडव्याच्या आगल्या दिवशी स्वराज्यात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारण्यात आली होती आणि वाजत गाजत दिंड काढली होती त्यानंतर संभाजींच्या शरीराचे तुकडे करण्यात आले .

अखेर ,अखेर तो औरंगजेब म्हणत राहिला  सचमुच छावा हे छावा शेर का , हमने आँखे निकाल दिये उसके लेकिन उसकी नजर झुकी नही हमारे सामने , हमने जबान कांट दि उसकी लेकिन उस जबान से  मांगे नही उसने रेहेम के दो लफ़ज , ह्मणे गर्दन कांट दि उसकी लेकिन उसकी गर्दन झुकी नही हमारे सामने , हमने पाव कांट दिये उसके लेकिन नही टेके उसने अपने  घुटने हमारे सामने , हमने हात कांट दिये उसके लेकिन नही फेलाये उसने अपने हात हमारे सामने . सचमुच छावा हे छावा शेर का .

‘ ये अल्लाह होंगे कामियाब कभी या ऐसेही लोटणा पडेगा खाली हात देहल्ली ‘  पण दिल्ली ला जायचं भाग्य त्याच्या नशिबात येऊच दिल नाही मराठ्यांनी . कारण  संभाजींच्या थेंबा थेंबातुन  इथं जन्माला आले हजारो लाखो संभाजी  आणि संताजी धनाजी लढत राहिले आणि राजा शिवाय मराठे चौदा वर्ष  औरंगजेबाशी टक्कर घेत राहिले .अखेर औरंगजेब गेला इथंच मेला ते त्या , त्या छाव्याच्या शौर्याच्या बळावर

” कस जगावं हे शिवरायांनी सांगितलं आणि कस मरावं हे संभाजींनी दाखवलं   ”

Sambhaji Maharaj Bhashan /Sambhaji Maharaj Nibandh/Sambhaji Maharaj Mahiti/Sambhaji Maharaj Mahiti Marathi/Sambhaji Maharaj in Marathi /Chatrpati Sambhaji Maharaj/Sambhaji Maharaj/Sambhaji Maharaj/Sambhaji Maharaj film/Sambhaji Maharaj story/Sambhaji Maharaj details/Sambhaji Maharaj death /Swarajy rakshak Sambhaji Maharaj

अश्याच प्रकारचे अनेक महापुरुष्यांच्या व यशस्वी माणसांच्या जीवनप्रवासाच्या आणि त्यांच्या यशाच्या संपूर्ण माहिती साठी blog24.org ला भेट देत रहा.

error: Content is protected !!