A, B1, B2, S, T, TS, & Z classification of BSE in Marathi

A, B1, B2, S, T, TS, & Z classification of BSE? शेअर्सची गटवारी

classification of BSE– मित्रांनो जर तुम्ही शेयर मार्केट मध्ये नवीन असणार तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे खुप गरजेचे आहे ,जसे कि कोणते शेयर्स पाहिजे व कोणते नाही .त्याचप्रकारे shares खरेदी करताना तुम्हाला त्या शेयर्स ची गटवारी हि माहिती असणे गरजेचे आहे . तेच आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे
A, B1, B2, S, T, TS, & Z classification of BSE? शेअर्सची गटवारी

What is Group A, B1, B2, S, T, TS, & Z classification of BSE? शेअर्सची गटवारी

classification of BSE– गुंतवणूकदारांना बाजाराचा कल कळावा म्हणून मुंबई स्टॉक-एक्स्चेंजने कंपन्यांची जशी वेगवेगळ्या इंडेक्समध्ये विभागणी केलेली आहे, तशीच गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्व शेअर्सची ‘A’, ‘BI’, ‘B2’, ‘s’, ‘T’, ‘TS’ आणि ‘Z’ अशी विभागणी केली आहे आणि त्यानुसार त्या त्या गटाला व्यवहारासंबंधात काही मर्यादा आणि अटी लागू
केल्या आहेत.
आपले सुरुवातीचे सारे व्यवहार मर्यादित स्वरूपाचे आणि त्यामुळेच कोणत्याही अटीमध्ये सुखाने बसू शकणारेच असल्यामुळे, आपल्याला त्या सर्वच अटींची वा मर्यादांची सविस्तर माहिती करून घ्यायची तूर्तास तरी आवश्यकता नाही. म्हणून आपण केवळ त्यांतील आपल्या कामापुरत्या मोजक्या गोष्टीच जाणून घेऊ.
तुम्ही ‘ऑन-लाईन’ किंवा ‘ऑफ-लाईन ‘गुंतवणूक करू बघता; तेव्हा सर्वप्रथम ती कंपनी कोणत्या गटातील आहे, हे पाहा. हा गट कुठे दिलेला असतो, ते मी पुढे सांगणारच आहे.
‘A’, ‘B1’, ‘B2’ आणि ‘S’ या गटांमध्ये आर्थिकदृष्ट्या खरोखरच भक्कम अशा कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे यांच्या शेअर्समध्ये इन्ट्रा-डे व्यवहार करायला परवानगी असते. या उलट ‘T’, ‘TS’ व ‘Z’ या ग्रुप्समधील शेअर्सचा व्यवहार लगेचच्या लगेच म्हणजे डिलिव्हरी घेऊनच पूर्ण करावा लागतो. याचा अर्थ या कंपन्या वाईट आहेत असे नव्हे; पण त्यांच्या
शेअर्समधील व्यवहारांवर सेबी आणि एक्स्चेंजने असे काटेकोर बंधन घातले नाही तर त्यात लबाडी करायला वाव मिळू शकेल. म्हणून दक्षतेपोटी हे बंधन आहे.
classification of BSE- मुंबई स्टॉक-एक्स्चेंज आणि अन्य विभागीय शेअर मार्केटमधील छोट्या कंपन्यांकडे भांडवलाचा ओघ वळावा म्हणून
‘s’हा नवा ग्रुप करण्यात आला असून त्याला ‘इंडोनेक्स्ट’ म्हणूनसुद्धा संबोधण्यात येते. ‘T’ ग्रुपमधील या कंपन्याही छोट्या आहेत पण त्यांचा इंडोनेक्स्टमध्ये समावेश नाही. गैरव्यवहारहोऊ नयेत म्हणून या गटात Online व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना सावध करण्यासाठी एक्स्चेंजतर्फे ‘पॉप-अप’ पद्धतीने सावधगिरीचा इशाराही देण्यात येतो.
‘F’ ग्रुपमध्ये फक्त ठरावीक परतावा (Fixed Income) देणाऱ्या कंपनी रोख्यांचा समावेश असतो.
G ग्रुपमध्ये फक्त सरकारी कर्जरोख्यांचा समावेश असतो .
Z ग्रुपमध्ये कंपन्या आहेत त्यांनी नोंदणी बाबत आवश्यक असलेल्या काही अटीचा भंग केलेला आहे . त्यामुळे जरी या कंपन्या पूर्णतः काळ्या यादीत टाकलेल्या नसल्या ,तरी त्यांच्या बाबतचे व्यवहार सावधतेने करावे एव्हडी मात्र अपेक्षा आहे . आपण जर नवीन असाल तर आपण यापासून दूरच असलेले चांगले .
classification of BSE– सेन्सेक्स चढला अथवा उतरला तर सर्वच्या सर्व कंपन्यांवर त्याचा समानच परिणाम होतो असे मुळीच नाही, हे दाखवण्यासाठी आपण नमुना म्हणून खुद्द BSE च्या अधिकृत वेब-पेजवरीलच २५ जानेवारी २००८ चा पुढील चित्ररूपी तक्ता पाहू. त्या दिवशी सर्व मिळून १,५५८ कंपन्यांच्या शेअर्सच्या दरांमध्ये आदल्या दिवसाच्या बंद भावापेक्षा (Previous Close) कमी-जास्त प्रमाणात का होईना पण वाढ झाली आहे. (हा आकडा सर्वांत तळाच्या Total नावाच्या ओळीत आणि Advance नावाच्या शीर्षकाच्या स्तंभामध्ये दिला आहे.) या उलट.१,१६४ कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात आदल्या दिवसाच्या बंद भावापेक्षा कमी-जास्त प्रमाणात का होईना पण घट झाली आहे. (हा आकडा सर्वांत तळाच्या Total नावाच्या ओळीत आणि ‘Decline नावाच्या शीर्षकाच्या स्तंभामध्ये दिला आहे.) आदल्या दिवसाच्या बंद भावापेक्षा
ज्यांच्या दरात काहीच फरक पडलेला नाही अशा कंपन्यांची संख्या ३६ आहे. (हा आकडा सर्वात तळाच्या Total नावाच्या ओळीत आणि ‘Unchanged नावाच्या शीर्षकाच्या स्तंभामध्ये दिला आहे.)
Scrip Group Advance Advance % to Total Declines Declines % to Total Unchanged % to Total Total
A 202 92.24 15 6.85 2 0.91 219
B1 578 87.05 84 12.65 2 0.3 664
B2 299 49.34 297 49.01 10 1.65 606
S 266 68.73 115 29.72 6 1.55 387
T 147 22.04 510 76.46 10 1.5 667
TS 33 29.73 76 68.47 2 1.8 111
Z 33 31.73 67 64.42 4 3.85 104
Total 1558 1164 36 2758
चित्राकडे काळजीपूर्वक पाहिलेत तर लगेचच लक्षात येईल की A ते Z गटांमधील किमती वाढलेल्या कंपन्या, किमती उतरलेल्या कंपन्या किंवा किमती स्थिर असलेल्या कंपन्यांची संख्या अर्थातच गटानुसार वेगवेगळी आहे. तुम्हांला तुलना करणे सोपे जावे म्हणून हे आकडे येथेटक्केवारीतही दिलेले आहेत. यावरूनही हा निष्कर्ष पक्केपणी काढता येतो की, प्रत्येक कंपनीच्या शेअर्समधील दरवाढ वा घट ही सेन्सेक्सला समांतर अथवा निगडित असतेच असे नाही. कंपनीच्या कार्यक्षमतेनुसार ती उलटसुलट कोणत्याही दिशेने वा कोणत्याही प्रमाणात असू शकते.
error: Content is protected !!