डिलिव्हरी (Delivery) व इंट्रा डे (Intraday) Trading म्हणजे काय ?

Difference Between Intraday and Delivery Trading in Marathi

Difference Between Intraday and Delivery Trading in Marathi|डिलिव्हरी व इंट्रा डेव्यवहार म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल आज त्याच प्रश्नाचे उत्तर आपल्या मराठी भाषेत तुम्हाला नीट समजून सांगणार आहे .

डिलिव्हरी (Delivery) व इंट्रा डे (Intraday) Trading म्हणजे काय ?

 



Shares व्यवहारातील डिलिव्हरी ही संकल्पना नीट समजण्यासाठी आपण येथेच दोन संकल्पना नीट समजून घेऊ एक म्हणजे shares चा डिलिव्हरी (Delivery) बेस्ड व्यवहार आणि दुसरी संकल्पना म्हणजे शेअर चा इंट्रा डे (Intraday) बेस्ड व्यवहार .

shares च्या खरेदी-विक्रीच्या जश्या Online आणि Offline या दोन पद्धती आहेत तसेच या व्यवहाराचे हि इंट्रा डे आणि डिलिव्हरी असे दोन प्रकार आहेत . हे दोन्ही प्रकार खरेदी-विक्रीच्या कालावधी शी संबंधित आहेत.

Intraday Trading Information in Marathi

इंट्रा डे (Intraday) म्हणजे शब्दशः एका दिवसात पूर्ण होणारे आणि सक्तीने एका दिवसात पूर्ण करावे लागणारे व्यवहार होय .

इंट्राडे (Intraday) व्यवहारात आपण प्रत्यक्षात सकाळी शेअर खरेदी करून आपल्या नावावर ट्रान्सफर न करतासुद्धा त्याच दिवशी शेअर बाजार बंद होण्यापूर्वी दुसर्‍याला कोणालाही विकू शकतो.

ज्याने आपल्याकडून ते शेअर खरेदी केले तो माणूस हि असेच त्याच्या नावावर ते shares ट्रान्सफर न करतासुद्धा तिसऱ्या कोणालाही त्याच दिवशी शेअर बाजार बंद होण्यापूर्वी विकू शकतो .



खरेदी आणि विक्रीचा हा व्यवहार तुमच्या पुरता एकाच दिवसात आणि तोही सकाळी 09:55 ते दुपारी ३.३० या कालावधीत पूर्ण झाला पाहिजे. Intra day व्यवहार कोणत्याही परिस्थितीत त्याच दिवशी पूर्ण करावा लागतो तो दुसऱ्या दिवसावर ढकलता येत नाही हे कायम लक्षात ठेवावे .

डिलिव्हरी व्यवहारातसुद्धा एका अर्थाने त्या शब्दाच्या अर्थाशी इमान राखून आहे, कारण डिलीवरी व्यवहारात शेअरची प्रत्येक्ष देवाण-घेवाण अपेक्षित असते .अर्थात येथे डिलिव्हरी याचा अर्थ share ची मालकी विकणाऱ्या च्या नावावरून खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर होणे इतकाच मर्यादित आहे.
डिलिव्हरी व्यवहारात shares ची मालकी दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होणे अपेक्षित असते . याचाच दुसरा अर्थ इंट्राडे व्यवहारात shares ची मालकी दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होणे जरुरीचे नसते.

डिलिव्हरी व्यवहारात खरेदी केलेले शेअर्स प्रत्यक्षात आपल्या ताब्यात आल्यानंतर म्हणजेच आपल्या नावावर ट्रान्सफर झाल्यावर मगच ते आपण दुसऱ्या कोणालाही विकू शकतो .

खरेदी केलेले shares  प्रत्यक्षात आपल्या नावावर Transfer होण्यासाठी म्हणजे सेटलमेंट साठी तीन दिवस लागतात .

त्यामुळे डिलिव्हरी बेसिस वर खरेदी केलेले shares  विकण्यासाठी तुम्हाला किमान चार दिवस तरी थांबावे लागते.  याउलट इंट्राडे बेसिस वर खरेदी केलेले shares पुढच्या मिनिटाला सुद्धा विकता येतात.

आपण खरेदी केलेल्या shares चा भाव पुढच्या पाच दहा मिनिटात दीड दोन रुपया ने वाढला असेल तर केवळ पाच दहा मिनिटात सुद्धा तुम्ही प्रत्येक share मागे १ ते १.३० रुपये कमवू शकतात.

100 शेअर खरेदी केले असेलत तर शंभर दीडशे रुपये नफा . १००० share खरेदी केलेले असलेत तर हजार दीड हजार रुपये नफा राहतो तोही पाच दहा मिनिटात.

इंट्रा डे बेसिस च्या तुलनेत डिलिव्हरी बेसिस shares च्या  खरेदी विक्री  वर ब्रोकरेज हि जास्त पडते. आणि त्यांची अशी पाच दहा मिनिटात विक्री करून पैसे कमवता येत नाहीत . त्यामुळे झटपट श्रीमंत होऊ पाहणारे सारे जण डिलिव्हरी बेसिस ऐवजी इंट्रा डे बेसिस वर व्यवहार करण्यासाठी आतुर असतात . तुम्हीही तसे आतुर असणारच त्यात काही गैर नाही  पण निदान आपली तरी अवस्था घी देखा पर बडगा नहि देखा अशी होऊ नये म्हणून ह्या चजक्रव्यूहात शिरण्याआधी याबद्दल जाणून घ्या .

इंट्रा डे बेसिस ब्रोकरेज खूपच कमी दराने आकारले जाते आणि त्या व्यवहारातून अगदी पाच दहा मिनिटात सुद्धा खूप पैसे मिळवता येऊ शकतात.

पण या दोन्ही गोष्टींपेक्षा सुद्धा झटपट श्रीमंत होऊ पाहणा-या लोकांना अधिक आकर्षण वाटणारी गोष्ट म्हणजे intra day व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे त्या व्यवहाराला लागणारी संपूर्ण रक्कम नसली तरी भागते.

अगदीच बिनभांडवली नव्हे तरी पण नाममात्र भांडवलावर हा धंदा ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने कसा चालतो ते आता आपण अगदी बारकाईने पाहू.

कारण किती नको नको म्हटले तरी तुम्ही हा प्रकार हाताळणाराच हे नक्की . त्यामुळे आपण एक उदाहरण घेऊनच हे दोन्ही व्यवहार आणि त्यातले फायदे तोटे नीट समजून घेऊ.

समजा माझ्याकडे गुंतवणुकीसाठी एक लाख रुपये उपलब्ध आहेत ती सारी रक्कम शेअर बाजारात गुंतवून मला शक्य तितके लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे आहे.

व्यवहार ऑनलाईन करू की ऑफलाइन करू यावर फारसा विचार करायचे मला कारण नाही कारण मला ही दोन्ही पदे उपलब्ध आहेत



मार्जिन आणि एक्स्पोजर

इंट्रा डे व्यवहारात शेअरची खरेदी करताना खरेदीची संपूर्ण रक्कम ब्रोकर कडे आगाऊ भरण्याची  आवश्यकता नसते ; पण खरेदीची ऑर्डर देण्यापूर्वी तुम्ही थोडीफार रक्कम मार्जिन म्हणून आगाऊ आगाऊ भरणे मात्र अपेक्षित असते .

तुम्ही मार्जिन म्हणून जेवढी रक्कम भरता त्याच्या पाचपट रकमेच्या shares ची तुम्हाला लगेच खरेदी करता येते मात्र मार्जिन च्या किती पटी ने खरेदी करू द्यायची हे सर्वस्वी तुमच्या ब्रोकर वर अवलंबून असते.

काही ब्रोकर मार्जिन च्या  चौपट काहीजण पाचपट्ट काहीजण सहापट व्यापार करू देतात.अशा रीतीने तुम्हाला एकूणच ज्या मर्यादे पर्यंत खरेदी करता येते तत्याला एक्सपोजर म्हणतात.

याचा अर्थ माझ्याकडे असलेले एक लाख रुपये मी मार्जिन म्हणून वापरून पाच लाख रुपयांपर्यंत एक्सपोजर मिळू शकेन .म्हणजे केवळ एक लाख रुपये मार्जिन च्या आधारावर पाच लाख रुपयांपर्यंतचे कितीही शेअर्स खरेदी करू शकेन . परंतु मी पाच लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केलीच पाहिजेत अशी मात्र अर्थातच माझ्यावर सक्ती नाही मी किती शेअर खरेदी करायचे हा सर्वस्वी माझ्या मर्जीचा प्रश्न आहे.

केवळ एक लाख रुपयांच्या मार्जिन च्या आधारावर माझ्यातर्फे पाच लाख रुपयांची खरेदी करण्यात ब्रोकरला थोडासुद्धा धोका वाटणार नाही. याचे कारण हा  Intra day व्यवहार असल्याने त्या दिवसाची Market ची वेळ संपण्यापूर्वी ते शेयर्स मला त्यात लोकांमार्फत विकणे भाग आहे.

विकलेल्या shares ची रक्कम परस्पर माझ्या हाती यायची सोय नसल्याने आणि विक्रीची रक्कम  आपोआप त्या ब्रोकरच्या खात्यात जमा होत असल्याने त्याला पैशांची फिकीर करण्याचे काही कारणच नाही.



इंट्राडे बाय ऑर्डर

समजा मी त्या पाच लाख रुपयांची प्रत्येकी शंभर रुपये किमतीचे पाच हजार शेअर्स खरेदी करायचे ठरवले तर सर्वप्रथम मला माझ्या ब्रोकरकडे तशी लेखी नोंदवावी लागेल त्यापोटी ऑफलाईन व्यवहारात मी एक लाख रुपये check ने भरेल .

ऑनलाइन व्यवहार तेवढी रक्कम मी Lien Mark केली तरी माझे भागू शकेल. अश्या प्रकारे तुम्ही १००००० रुपया वर ५००००० रुपयाचे शेअर्स खरेदी करू शकणार.

शेयर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती मराठीतून

error: Content is protected !!