Share Market in Marathi शेयर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती मराठीतून

शेयर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती मराठीतून

Share Market in Marathi मराठी माणूस आणि shares market हे सूत्र काही जमण्यासारखे नाही असे अनेकांना वाटते . कारण प्रत्येकाच्या नजरा ह्या मराठी माणसाला गुलामगिरी करणारा म्हणजेच एकतर कुठेतरी नोकरी करणारा अथवा एखाद्या नेत्याच्या मागे फिरणारा वाटतो .

आपण नेहमी share market in marathi हे गूगल वर शोधत असतो परंतु आपल्याला याचे योग्य असे उत्तर नाही मिळत . आज तुमचे सर्व प्रश्न मिटणार आहेत तसेच जर तुम्ही share market in marathi pdf हे सर्व शोधात असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि तुम्हाला येथे सर्व काही शिकायला मिळेल ज्यास तुम्ही share market information in marathi असे लिहून शोधतात .

Share Market Training in Marathi

मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही अथवा तो shares (share market training in marathi) मार्केट मध्ये गुंतवणूक नाही करू शकत हा एक गैरसमज मराठी माणसात काही परप्रातिंयानी भरून ठेवला आहे .

परंतु खरी गोष्ट तर हि आहे कि सर्वाना माहिती आहे जर मराठी माणसाने मनावर घेतले तर तो काहीही करू शकतो याचा इतिहास आहे आणि त्याचीच भीती त्यांना वाटते जर मराठी माणूस हे सर्व करू लागला तर यांना नोकर कुठून मिळणार .

Share Market in Marathi –आपल्या पूर्वजांनी आपल्या मनात आणि डोक्यात आधीपासून हे भरून ठेवले आहे कि कर्ज नाही घ्यायचे त्याचप्रमाणे मराठी माणूस व्यवसाय नाही करू शकत ,शेयर मार्केट म्हणजे जुआ असतो त्यात कित्येक लोक बरबाद झाले आहे .हे सर्व सांगणाऱ्यांनी कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही अथवा हिम्मत केली नाही .मोठा व्यवसाय उभारण्यासाठी मोठ्या कंपनी ही कर्ज घेतात आणि हिमतीने ते फेडतात ही . योग्य आयडिया असेल तर व्यवसाय नक्की success देतो मात्र त्या साठी सर्व पूर्व तयारीही असणे गरजेचे असते .

फक्त डोळे बंद करून कुठे ही पैसे नाही लावायचे . एव्हडे सर्व सांगायचा उद्देश एकच होता कि मराठी माणूस हि शेयर मार्केट मध्ये success मिळवू शकतो .

आता आपण share market information in Marathi मध्ये  जाणून घेऊया .

Share Market in Marathi
Share Market in Marathi

शेअर्स मार्केट म्हणजे काय  (Share Market In Marathi) ?

Share Market in Marathi- शेअर्स मार्केट म्हणजे काय त्यात चांगले share कोणते हे जाणून घेण्यापूर्वी शेअर्स म्हणजे काय आणि ते किती प्रकारचे असतात हे आपण माहिती करून घेणे अति आवश्यक आहे .

share market knowledge in Marathi

कंपनीचे अधिकृत भांडवल म्हणजे काय ?

कारण कोणत्याही गोष्टीची पुरेपूर माहिती नसताना अर्धवट किंवा सांगोवांसांगीच्या माहितीवरून आपण व्यवहार करायला गेलो तर आपल्या हातून चूक होण्याची शक्यता अधिक असते आणि शेअर बाजारात चूक करणे म्हणजे सरळ सरळ स्वतःच्या खिशाला कात्री लावून घेणे अथवा आपले मेहेनतीचे पैसे डुबवणे होय .

प्रत्येक कंपनीस आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल कॅपिटल हे लागणारच किंवा आपला चालू व्यवसाय अधिक वाढवण्यासाठी हि अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता लागणार असते .
आणि अश्या लागणाऱ्या भांडवलाची उभारणी कोणतीही लिमिटेड कंपनी दोन मार्गांनी करू शकते एक म्हणजे जनते मध्ये आपल्या शेअरची विक्री करून आणि दुसरे म्हणजे कर्ज उभारून .
कोणतीही कंपनीने कंपनी उभारण्यासाठी स्वतःजवळील काही भांडवल जमवलेले असते त्या रकमेला कंपनीचे अधिकृत भांडवल असे म्हणतात.

शेयर म्हणजे काय (Share Market in Marathi)

Share Market in Marathi- शेयर म्हणजे कंपनीच्या समभागातील वाटा.प्रत्यक्षात शेअर विकून जी रक्कम जमा होते त्या रकमेला कंपनीचे share भांडवल किंवा शेअर कॅपिटल असे म्हणतात .

शेअर म्हणजे केवळ कंपनीच्या मालकीत म्हणजेच मालमत्तेत आणि नफ्यात हिस्सा तोट्यात नव्हे . कंपनीला तोटा झाला तर तो भरून देण्याची shares holders वर कोणतीही जबाबदारी नसते त्याने एकदा आपल्या शेअर्सचे पैसे कंपनीत भरले असले की त्याची आर्थिक जबाबदारी संपते यापुढे तो फक्त नफ्याचा भागीदार असतो . अर्थात हेही खरे आहे की कंपनी तोट्यात गेली तर shares holder चे पैसे परत करायला अथवा त्याला कसलेही नुकसान भरपाई द्यायला कंपनी बांधील असत नाही.

या दृष्टीने गुंतवणूक धोकादायक असली तरी कंपनी चांगली चालली तर मिळणारा फायदा इतका मोठा ठरू शकतो की गुंतवणूकदार त्यातील धोक्याकडे खुशीने दुर्लक्ष करण्यास तयार होतो .

Share Market in Marathi
                                         Share Market in Marathi

share ची Market price म्हणजे नेमके काय ?

Share Market in Marathi -share market मध्ये shares चा जो भाव चालू असतो त्या किमतीला शेअरची मार्केट प्राइस अथवा बाजार भाव म्हणतात .किंवा बाजारात तुम्ही ज्या किमतीला SHARES खरेदी अथवा विक्री करतात त्या किमतीस त्या share ची मार्केट price असे म्हणतात .

आपको यह जरूर पढ़ना चाहिए

Share Market In Marathi-शेयर मार्केट द्वारे पैसे कसे कमवायचे

BNST (Buy Now, Sell Tomorrow) म्हणजे काय ?

BNST (Buy Now, Sell Tomorrow) म्हणजे काय ?

डिलिव्हरी (Delivery) व इंट्रा डे (Intraday) Trading म्हणजे काय?

शेयर ची फेस व्हॅल्यू म्हणजे काय ?

कंपनीने शेअर सर्टिफिकेट वर जी किंमत छापलेले असते त्या किमतीला छापील किंमत दर्शनी किंमत किंवा फेस व्हॅल्यू असे संबोधले जाते.

Larsen & Turbo कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी करायला गेलात तर तिच्या Share चा आजचा बाजार भाव (Market Price ) ७८३ (३ एप्रिल २०२०) रुपये आहे यास share ची मार्केट price असे म्हणतात .ह्याच शेअर ची face value हि मात्र २ रुपये आहे .

प्रायमरी मार्केट व सेकंडरी मार्केट म्हणजे काय ?

1- प्रायमरी मार्केट –

कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात करणाऱ्या कंपनीला जेव्हा भांडवल विस्ताराची अथवा नवीन कंपनीस भांडवल उभारायची गरज पडते, तेव्हा त्यांच्यासमोर पब्लिक लिमिटेड होणे हा एक मार्ग असतो.

पब्लिक लिमिटेड होताना कंपनीला स्वतःच्या मालकीचे विभाजन करावे लागते, आणि काही भाग स्वतःकडे ठेवुन बाकीचे भाग म्हणजेच शेअर्स हे बाजारात विक्रीसाठी काढावे लागतात.

शेअर भाग विक्रीमधून जे पैसे जमा होतात त्याचा वापर कंपनीच्या भांडवलासाठी केला जातो .
कोणतीही कंपनी जेव्हा पहिल्यांदा असे समभाग बाजारात विक्रीस काढते त्यास इनिशिअल पब्लिक ऑफेरींग किंवा IPO (आय.पी.ओ.) असं म्हणतात. हे आहे प्रायमरी मार्केट.

2- सेकंडरी मार्केट-

भारतामधे सेकंडरी मार्केट म्हणजेच शेअर मार्केट हे प्रामुख्यानी दोन प्लॅटफॉर्मवर चालतात आणि ते म्हणजे बीएसई (Bombay Stock exchange) आणि एनएसई (National Stock exchange).म्हणजे सामान्य व्यक्ती अथवा कंपनीचे promoters आपले shares खरेदी अथवा विक्री आपसात करतात त्या मार्केट ला सेकंडरी मार्केट असे म्हणतात .
सेकंडरी मार्केट मधील खरेदी विक्रीतील मजेची गोष्ट म्हणजे बाजारात शेअर्सची किंमत कितीही कमी जास्त झाली तरी कोणत्याही कंपनीच्या दैनंदिन व्यवहारात त्याचा थेट कोणताही परिणाम व्हायचे खरे तर काहीही कारण नसते . कारण दोन व्यक्तीमधील shares च्या खरेदी-विक्री व्यवहारातील खरेदीची किंवा विक्रीची कोणतीही रक्कम कंपनीच्या खाते बुकात जमा नावे पडत नसते .

तुम्ही भारतात शेअर मार्केट  (Share Market in Marathi) मध्ये दहा हजारांहुन जास्त कंपन्यांच्या शेअर्स मधे खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करु शकता.

शेअर्स च्या किमती ह्या वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे त्याविषयी आपण जागृत राहिले पाहिजे .
आपण रोज वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर आपल्यला समजत असते कि आज शेअर निर्देशांक इतका वधारला किंवा कोसळला .

ज्या व्यक्तींकडे भारतीय पॅन कार्ड आहे अशी प्रत्येक व्यक्ती शेअर मार्केट मध्ये काम करु शकते व पैसे कमाऊ शकते

शेअर मार्केट बद्दल हिंदीत माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .