Indurikar Maharaj Kirtan – इंदुरीकर महाराज

Indurikar Maharaj Kirtan – इंदुरीकर महाराज

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Kirtan ) म्हटलं तर महाराष्ट्रातील लहान मुलगा हि सांगेल अशे प्रखर व्यक्तिमत्व आहे . यावरून तुम्हाला वाटत असेल इंदुरीकर महाराज म्हणजे मोठे पिढीजात श्रीमंत असे व्यक्ती असावे .

Indurikar Maharaj Biography इंदुरीकर महाराज हे कोण

परंतु इंदुरीकर महाराज हे कोणी मोठ्या बापाचे पुत्र नसून एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला .त्यांचे पूर्ण नाव निवृत्ती महाराज काशिनाथ देशमुख असे आहे,  त्यांचे मूळ गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील इंदुरी हे आहे आणि त्याच गावाच्या नावाने त्यांना इंदुरीकर म्हणून संबोधले जाते निवृत्ती महाराज इंदुरीकर हे BSC , BED आहे .

Indurikar Maharaj हे एका जिल्हापरिषदेच्या शाळेत शिक्षक होते , ते आपल्या विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांना शिकवत असत . त्यामुळे ते शाळेतील सर्व मुलांचे आवडते शिक्षक होते.

चांगली नोकरी असूनही फक्त समाज प्रबोधनाकडे आधीपासूनच त्यांचा कल होता,त्यामुळे त्यांनी भक्ती मार्गाची वाट धरली आणि वारकरी संप्रदायाच्या मार्गाने आपली वाटचाल करून आज महाराष्ट्रातील थोर असे कीर्तनकार आहेत.

कधी काळी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते आज बाजूच्या गावात कीर्तन करायला पायी अथवा सायकल वर प्रवास करत असत .

आज एखाद्या नेत्याच्या भाषणाला जेव्हडी गर्दी नाही होत तेव्हडे लोक इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाला जमतात.

इंदुरीकर महाराज यांच्या पत्नीचे नाव शालिनीताई देशमुख असे आहे . त्याही कीर्तनकार आहेत . त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे असा त्यांचा परिवार आहे .

indurikar maharaj kirtan
             indurikar maharaj kirtan(Indurikar Maharaj Wifi Photo)

Image Credit : – bolbhidu

मित्रांनो आधी कीर्तनास फक्त वयस्कर लोकच सहभागी होत असत कारण नवीन पिढीस कीर्तन म्हणजे वायफळ वाटत असे त्यांना त्याचे महत्व समजत नसे त्यामुळे कीर्तन हे फक्त एका पिढीतील व्यक्तींकरता मर्यादित झालेले होते .
परंतु इंदुरीकर महाराजानी हे सर्व चित्र बदलून टाकले आणि आपल्या कीर्तनातून ह्या नवीन पिढीस भक्तिमार्गाला लावले .

latest Article 

swapnil joshi स्वप्नील जोशी यास ‘रामायणात भूमिका कशी मिळाली’

Marathi Status For WhatsApp-व्हाट्सअप मराठी स्टेटस

Exam status in Marathi मराठी मध्ये Students Exam status

इंदुरीकर महाराज फक्त कीर्तन नाही करत तर त्या कीर्तनातून ते नवीन पिढीस सत्याचा व धर्माचा आणि योग्य कर्माचा कडू असा काढा पाजत असतात .

त्यांचे कीर्तन हे विनोदी स्वरूपाचे असते ज्यामुळे ते लहान मुलापासून तर म्हाताऱ्या व्यक्ती पर्यंत सर्वाना आवडते .

इंदुरीकर महाराजांचे कीर्तन जरी विनोदी असले तरी ते आपल्या विनोदातून समाजातील खरी परिस्थितीचे योग्य असे वर्णन करतात व त्याच प्रमाणे महाराष्ट्राच्या नवीन पिढीस आपल्या विनोदी कीर्तनातून कसे वागावे व कसे वागू नये हे योग्य प्रमाणे समजवतात .

ते आपल्या कीर्तनातून एक आई कशी असावे एक आदरणीय वडील कसे असावे मुलीने कसे वागावे हे सर्व विनोदाने जनतेस पटऊन देत असतात .

नवीन पिढीस कीर्तन व कीर्तनकार हा शिक्षित व नवीन पिढीच्या भावना जाणणारा आहे असे वाटावे म्हणून ते आपल्या कीर्तनात अधून मधून इंग्रजी भाषेचा वापर करतात .

इंदुरीकर महाराजांचे कीर्तन घरो घरि पोहचवले ते CD व DVD ने आणि पुढे इंदुरीकर महाराजाना अनेक राजकीय पुढाऱ्यां कडून काही कार्यक्रमा निमित्ताने कीर्तनासाठी बोलवणे येऊ लागले आणि ते पूर्ण महाराष्ट्र भर गाजू लागले .

indurikar maharaj kirtan

                                          indurikar maharaj kirtanImage Credit:- sputniknews

खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु, तालुका संगमनेर’ ही शाळा आहे. बुहतेक मुलं येथे अनाथ आहेत.”गेल्या 15 वर्षांपासून महाराज या मुलांचा शैक्षणिक खर्च स्वत: करत आहेत.

इतकंच नाही तर महाराज स्वत: 9वी आणि 10वीच्या मुलांचा सायन्सचा क्लास घेतात. ही शाळा इतर साधारण शाळेप्रमाणे नसून पूर्णतः हा डिजिटल शाळा आहे .

त्याचप्रमाणे आसपासच्या गावांमध्ये बंद पडलेले सप्ते (सप्ताह) महाराजांनी स्वत:च्या खर्चातून सुरू केले. यामुळे मग तरुण मुलं संप्रदायात येऊ लागली. महाराज शेजारच्या गावांमधील मंदिराला कलर देतात, देणगी देतात, मंदीर कोणतंही असो, मूर्ती मात्र महाराजच देतात.

त्याचप्रमाणे इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) भाकड गायींना आपल्या संस्थेच्या गोशाळेत आणतात मग एखाद्या शेतकऱ्याला गाय हवी असल्यास त्याच्याकडून लिहून घेतत की, ‘तुला ती विकता येणार नाही’ आणि मगच त्याला ती गाय दिली जाते .


indurikar maharaj kirtan mp3 download,indurikar maharaj video,indurikar maharaj comedy