BNST (Buy Now, Sell Tomorrow) म्हणजे काय?
शेअर मार्केट मराठी-BNST हे Buy Now, Sell Tomorrow- चे संक्षिप्त रूप आहे. सर्वच शेअर्सच्या बाबतीत सर्वच शेअर-ब्रोकर्सकडे ही सुविधा उपलब्ध आहेच असे नाही. तुमच्या ब्रोकरकडे ही सुविधा उपलब्ध आहे की नाही आणि असली तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहेत, याची प्रथम खात्री करून घ्या.(शेअर मार्केट मराठी)
Share Market बद्दल मराठीत update मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला like करा .
शेअर मार्केट मराठी-BNST हे Buy Now, Sell Tomorrow- मराठी माणसासाठी शेयर मार्केट ची संपूर्ण माहिती हि मराठीतून देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो .ज्ञान हे वाटल्याने वाढत असते यावर आमचा पूर्ण विश्वास आहे .
आम्ही शेयर मार्केट चे संपूर्ण ज्ञान हे मराठीतून पूर्णपणे मोफत तुम्हाला ह्या ब्लॉग द्वारे पुरवत आहोत . त्यामुळे याचा नक्की वापर करा आणि शेयर मार्केट मध्ये या व भरघोस कमाई करा .
STOCK MARKET मध्ये फ्री मध्ये DEMAT ACCOUNT उघडण्यासाठी येथे क्लिक करा :- Click Here
काही ब्रोकर्सकडे हीच योजना BTST म्हणजे Buy Today, Sell Tomorrow या नावाने राबवली जाते.
एका दृष्टीने पाहता इन्ट्रा-डे बेसिस आणि डिलिव्हरी बेसिस यांमध्ये असलेल्या काही त्रुटी दूर करून; तसेच एक जादा सुविधा देऊन गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा आणि त्यातून स्वत:चाही व्यवसाय वाढवण्याचा हा काही ब्रोकर्सचा वैयक्तिक प्रयत्न आहे.
खाली दिलेले पुस्तके तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकतात .
- शेअर बाजाराची ओळख -हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा .
- Technical Analysis Aani Candlesticksche Margdarshan
- ३० दिवसात व्हा शेअर मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणूकदार
- Share Market : शेअर बाजार
RELETED
Share Market Marathi -डिमॅट म्हणजे काय?
डिलिव्हरी (Delivery) व इंट्रा डे (Intraday) Trading म्हणजे काय
शेयर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती मराठीतून-Share Market in Marathi
नेहमीच्या पद्धतीत इन्टा-डे पद्धतीने खरेदी केलेले शेअर्स त्याच दिवशी सक्तीने विकावेच लागतात. या उलट, डिलिव्हरी बेसिसवर खरेदी केलेले शेअर्स तुमच्या नावावर ट्रान्स्फर झाल्याशिवाय तुम्ही विकू शकत नाही. या दोन्ही अडचणींवरचा BNST हा मध्यम मार्ग आहे.
यामध्ये समाविष्ट असलेले शेअर्स तुम्ही आज BNST बेसिसवर खरेदी केलेत की तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही तुमच्या नावावर ट्रान्स्फर होण्यापूर्वीच म्हणजे त्याच दिवशी किंवा दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशीही विकू शकता आणि असे मोकळे झालेले तुमचे भांडवल अन्य शेअर्सच्या खरेदीसाठी लगेच वापरू शकता.
अर्थात अशा प्रकारे BNST वर शेअर्स खरेदी करताना तुम्हांला डिलिव्हरी बेसिसवरील खरेदीप्रमाणेच संपूर्ण रक्कम भरावी लागते.
शिवाय शेअर्स विकताना ते सारेच्या सारे शेअर्स तुम्ही BNST मध्ये विकू शकत नाही. तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्सच्या संख्येपैकी फक्त ७५ टक्के शेअर्स तुम्ही BNST मध्ये विकू शकता.बाकी २५ टक्के शेअर्स ते तुमच्या नावावर ट्रान्स्फर झाल्यावरच विकू शकता.
शेअर मार्केट बद्दल हिंदीत माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .
DOWNLOAD PDF
Share Market tips related best YouTub channels in India
‘BNST-Buy Now, Sell Tomorrowआ बैल मुझे मार’
शेअर मार्केट मराठी-BNST हे Buy Now, Sell Tomorrow – जर स्वत:च्या खिशात गुंतवणुकीसाठी मर्यादितच पैसे असतील आणि ती सारीच्या सारी रक्कम आपल्याला इन्ट्रा-डे पद्धतीनेच गुंतवायची असेल, तर सर्वप्रथम आपला जीव छोटा आहे, याची पूर्ण जाणीव ठेवा.
आपल्याला एका वेळा फार फार तर हजार-दोन हजार रुपये इतकाच तोटा सहन करता येतो, त्यापेक्षा जास्त तोटा सहन करणे आपल्याला परवडत नाही, याचीही पूर्ण जाणीव ठेवा.
म्हणून सरळ गणित मांडा, समजा, मी केवळ दहा हजार रुपयेच गुंतवले आणि मला १० टक्के तोटा सहन करावा लागला, तर मला तेवढ्या गुंतवणुकीवर फार फार तर एक हजार रुपये तोटा होईल आणि तेवढा तोटा मी सहजपणे सहन करू शकेन. पण तरीही माझं ९.००० रुपये भांडवल शिल्लक व सुरक्षित राहील.
पण जर ती रक्कम मार्जिन म्हणून वापरून मी पन्नास हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले आणि मला १० टक्के तोटा झाला, तर मग मला ५,००० रुपये तोटा सहन करावा लागल आण तेव्हा मात्र माझ्या कुवतीपलीकडचं ठरेल .
शिवाय एका फटक्यात माझे भांडवल ५० टक्क्यांनी कमी होईल, ते वेगळेच! त्यामुळे जरी भांडवल हे मार्जिन म्हणून वापरून पाचपट गुंतवणूक करायची सुविधा उपलब्ध असली; तरी कोणत्याही परिस्थितीत त्या वाटेला जायचे नाही, असा ठाम निश्चय करा.
पण सर्वांना नेमका उलटा मोह पडतो. १० टक्के तोटा होण्याचीसुद्धा शक्यता गृहीत धरण्याऐवजी १० टक्के नफाच होईल, असे ते सारेजण प्रत्येक वेळीच गृहीत धरतात. त्यामुळे १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर केवळ एक हजार मिळवण्याऐवजी पन्नास हजार गंतवल्यासारखे दाखवून पाच हजार रुपये मिळवणे, त्यांना जास्त पसंत पडते.
(Think Positive, हा उपदेश योग्यच आहे, पण ती शिकवण अमलाता आणण्याची ही जागा नव्हे)
Sarkari Naukari : Click Here
Shrikant Vadnere is the chief Digital Marketing Expert and the Founder of Blog24.org,studyjobline.blog24.org and phyxzn.com He has a very deep Interest in all technology and Business related topics what so ever.