Demat Account in Marathi | डिमॅट म्हणजे काय?
Demat Account in Marathi | डिमॅट म्हणजे काय? – आज आपण शेअर मार्केट मराठी (Share Market Marathi) च्या ह्या भागात समजून घेणार आहोत What is a depository and how it is different from depository participant.
डिपॉझिटरी आणि डिमॅट आपल्या देशात 1996 मध्ये (NSDL) National Securities Depository Limited आणि 1999 मध्ये (CDSL) Central Depository Services Limited या दोन मध्यवर्ती Depository स्थापन झाल्या .
आपण जसे आपल्या घरातील मौल्यवान वस्तू बॅंकेच्या डिपॉझिटरी लॉकरमध्ये ठेवतो आणि गरज पडेल तेव्हा तेवढ्या पुरत्या घरी घेऊन येतो, त्याच धर्तीवर shares च्या संदर्भात डिपॉझिटरी चे काम चालते .
ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या काही बँका आणि नामवंत ब्रोकर्स ह्या दोन्ही डिपॉझिटरी पैकी एकीचे डिपॉझिटरी पार्टीसिपंट म्हणजेच (dp) depository participant म्हणून काम करतात .
प्रत्येकाने आपल्या कडील शेअर सर्टिफिकेट्स यातील कोणत्याही एका डिपॉझिटरी पार्टीसिपंट कडे जमा करायची आणि गरज पडेल तेव्हा ती काढून घ्यायची अशी जणू ही व्यवस्था असते .
पण सेफ डिपॉझिट लॉकर पेक्षा अधिक सुटसुटीत आणि सोयीची ! याचे कारण ,तुम्ही तुमच्याकडील शेअर सर्टिफिकेट डीपी (depository participant) कडे दिल्यावर DP तुमच्या नावाचे खाते उघडले आणि तुम्हाला एक विशिष्ट असा कोड नंबर देते .
प्रत्येक सर्टिफिकेट च्या नंबर पुढे मालकी दर्शक म्हणून तो कोड नंबर टाकला जातो .
त्या सर्टिफिकेटची एक नोंद डिपॉझिटरी च्या कॉम्प्युटर मधील लिस्ट मध्ये केली जाते आणि दुसरी नोंद डीपी (depository participant) मधील तुमच्या खात्यात केली जाते. आणि मग कागदावर छापलेले ते मूळ सर्टिफिकेट चक्क नष्ट करून टाकले जाते कायमसाठी !
म्हणजेच आता एके काळी हातात प्रत्यक्षात घेता येऊ शकणाऱ्या त्या Certificate ची नोंद केवळ डीपीमध्ये तुमच्या खाते बुकात आणि डिपॉझिटरी च्या तुमच्या रजिस्टर मध्ये शिल्लक राहते . आणि तीही केवळ कम्प्युटर वरील माहिती च्या स्वरूपात .
Relate Article
What is Share Market In Hindi : शेयर बाजार क्या है?
Stock Market In Marathi-शेयर मार्केट द्वारे पैसे कसे कमवायचे
डिलिव्हरी (Delivery) व इंट्रा डे (Intraday) Trading म्हणजे काय?
Demat Account in Marathi | डिमॅट अकाउंटम्हणजे काय ?- what is the demat account
Demat Account In Marathi – एका अर्थाने हाताने स्पर्श न करता येणाऱ्या स्वरूपात म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असे शरीर हीन रूपांतर करणे म्हणजेच मटेरियलचे चे डिमटेरियलयशाशन करणे – डिमॅट करणे होय .
Demat Account in Marathi :- डिमॅट अकाउंट म्हणजे शेअर्स ,बॉण्ड डिबेंचर इत्यादींचा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात लेखा जोखा ठेवणारे खाते होय .
A Demat account or dematerialised account converts the shares from the paper form into an electronic form. They are similar to pass books offered by the banks where you have opened an account. You can easily buy or sell shares of different companies using your Demat account. All the transactions are entered into it akin to the bank passbook.
Demat account- सुरक्षितता
डीपी (depository participant) मधील तुमचीही डिमॅट share जर तुम्ही दुसऱ्या कोणाला विकलीत तरच तुमच्या डीपी (depository participant) मधून बाहेर जाणार आणि जर ते स्वतः लाईन मार (Lien Mark ) केले तरच ते डीपी (depository participant) मधून बाहेर काढून तुम्हाला विकता येणार.
Lien Mark करायचे तर ती लाईन मार्ककिंग केवळ तुमच्या ऑनलाईन अकाऊंट मधूनच होऊ शकणार . हा अकाउंट 128 बिट्स नी इन्स्क्रिप्टेड आहे आणि तुमचा पासवर्ड भरल्या शिवाय अन्य कोणीच काय पण तुम्हीसुद्धा ते अकाऊंट उघडू शकणार नाही .शिवाय तुमचा Transaction Password भरल्याशिवाय खुद्द तुम्हालासुद्धा लाईन मार्किंग करताच येणार नाही .
त्यामुळे या व्यवहाराच्या सुरक्षेची काळजी करण्याचे काही कारणच नाही दुसरे म्हणजे डिमॅट shares dp तुन काढले तर ते दुसऱ्या कोणाच्या नावावर ट्रान्सफर झाले हे हि डिपॉझिटरीत नोंदवावेच लागते. आणि त्या व्यवहाराची संपूर्ण नोंद म्हणजे ऑर्डर नंबर वेळ किंमत ट्रेडिंगची वेळ ही सारी माहितीही ब्रोकर कडून येणाऱ्या कॉन्टॅक्ट नोट वर असावीच लागते .
त्यामुळे डीपी (depository participant) संबंधित संपूर्ण व्यवहार पूर्ण पारदर्शक पद्धतीने होतात आणि तिसरे म्हणजे दिवसाचे चोवीस तास घरबसल्या तुम्ही त्यावर नजर ठेवू शकतात त्यामुळे त्यात काही गडबड घोटाळा होण्याची शंका मनातून पूर्णपणे काढून टाका
Share Trading in Marathi|शेअर ट्रेडिंग म्हणजे काय ?
share ब्रोकरला अमुक कंपनीचे अमुक इतके शेअर्स खरेदी करा असा अमुक एका कंपनीची अमुक इतके शेअर्स विकून टाका अशी नुसतीच ऑर्डर देऊन भागत नाही ती त्याने आम्लात हि आणावी लागते तरच व्यवहार पूर्ण होतो .अशा पूर्ण झालेल्या व्यवहाराला Shares ट्रेडिंग असे म्हणतात .
Line Marking in Marathi|लाईन मार्किंग म्हणजे काय?
ब्रोकरला अशी ऑर्डर देण्यापूर्वी ती ऑर्डर आपण खरोखरच गंभीरपणे दिले आहे आणि ती आपल्यावर बंधनकारक राहील याचा त्याला भरोसा देण्यासाठी आपल्याला आपल्या ऑनलाईन खात्यातून त्या व्यवहारापुरेशी रक्कम ब्रोकरच्या खात्यात वर्ग करावी लागते रक्कम वर्ग करण्याबाबत आपण बँकेला दिलेल्या सूचनेला लाईन मार्किंग म्हणतात .
तुमच्या खात्यातून अनधिकृतपणे व्यवहार होऊ नये यासाठी काळजी म्हणून तुमच्या अकाउंट मध्ये दोन पासवर्ड चा वापर केला जातो पहिला पासवर्ड हा अकाउंट उघडून त्याचे निरीक्षण करण्यासाठी असतो तर दुसरा पासवर्ड प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी वापरला जातो.
Contract and Contract Note in Marathi|कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्टॅक्ट नोट म्हणजे काय?
खरेदी-विक्रीचा सारा व्यवहार शेअर ब्रोकर तुमच्या मार्फत तुमच्या सूचनेवरून आणि तुमच्या संमतीने करत असतो तेव्हा तुम्ही ब्रोकर कडे खाते उघडतात तेव्हाच तुम्ही या कामाचे त्याला अधिकार पत्र दिलेले असते . तुमचा प्रत्येक व्यवहार हे एक कॉन्टॅक्टच असते.
अशा कॉन्टॅक्ट नुसार त्याने केलेल्या प्रत्येक व्यवहाराची माहिती तुम्हाला दिवसाअखेर एका विशिष्ट पद्धतीच्या फॉर्मवर लेखी नोंद करून देत असतो .
त्या नोंदीना कॉन्टॅक्ट नोट असे म्हणतात , intraday shares treading व्यवहारात तुम्ही सकाळी खरेदी करता आणि थोड्यावेळाने पुरेसा नफा मिळाला तर ते shares विकून टाकतात . सर्वसाधारणपणे या प्रकारच्या व्यवहारात एका कंपनीचे जेवढे shares घेता तेवढेच shares परत विकतात .
पुन्हा त्याच दिवशी नव्याने काही shares विकत घेतात आणि पुन्हा तेही विकून टाकतात .
सकाळी ९.५५ ते दुपारी ३.३० या कालावधीत तुम्ही हा खेळ कितीही वेळ घेऊ शकतात अर्थात केवळ तत्वत !
प्रत्यक्षात तुम्ही रुपया दोन रुपये किमतीच्या केव्हा पाच-दहा shares चा एकेक व्यवहार करून सर्व कामकाजाचा खेळ खंडोबा करू नये म्हणून बहुतेक ब्रोकर एका दिवसात एका कॉन्टॅक्टमध्ये जास्तीत जास्त पाच किंवा सात इंट्राडे शेअर व्यवहार आणि दोन तीन shares डिलिव्हरी व्यवहार करता येतील असे बंधन घालतात. पण अशा रीतीने तुम्ही दिवसभरात कितीही व्यवहार केलेत,
तरी प्रत्येक व्यवहार हे स्वतंत्र कॉन्टॅक्ट न समजता दिवसाअखेर केलेले सारे व्यवहार म्हणजे कॉन्टॅक्ट समजतात आणि त्या सर्वांची मिळून एकच कॉन्टॅक्ट नोट बनवतात .
Share Contract Note म्हणजे त्या संपूर्ण व्यवहाराची आणि संबंधित हिशोबाची अत्यंत तपशीलवार लेखी नोंद होय .
दिवसभरातील सर्व व्यवहारांची मग ते डिलिव्हरी बेस्ट असो अथवा इंट्राडे व्यवहार असोत त्यांची एकच कॉन्टॅक्ट नोट बनवले असले तरी NSE आणि BSE या दोन्ही Exchange वरील नोट स्वतंत्र बनतात .
shares चा व्यवहार ऑनलाइन असो व ऑफलाईन असो तुम्हाला प्रत्येक व्यवहाराची अशी लेखी नोंद मिळते ती बहुधा त्याच दिवशी रात्री पर्यंत , हा ऑनलाइन व्यवहारात ती ई-मेलवरून रात्रीपर्यंत लगेचच हातात मिळते.
ऑफलाइन व्यवहारांमध्ये मात्र तुम्हाला ब्रोकरच्या ऑफिसमधून संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी स्वतः जाऊन तरी घ्यावी लागते अथवा कुरियर मार्फत व पोस्टाने पाठवली तेव्हा तुमच्या हाती पडते .
पण 24 तासांच्या आत ती तयार असेल हे नक्की कारण नियमानुसार 24 तासांच्या आत कॉन्टॅक्ट नोट तयार असावी लागते कॉन्टॅक्टमध्ये नोंदी संगणकाद्वारे होत असल्याने त्यातील आकडेमोड तपासून पाहण्याची तशी आवश्यकता नसते पण तरी आपल्या स्वतःच्या माहितीसाठी कॉन्टॅक्ट नोट वरील नोंदी आपण शकतो .
Shrikant Vadnere is the chief Digital Marketing Expert and the Founder of Blog24.org,studyjobline.blog24.org and phyxzn.com He has a very deep Interest in all technology and Business related topics what so ever.